Home Breaking News Beed dist @news •आष्टीत बनावट मतदार नाव नोंदणी,—- •माजी आ....

Beed dist @news •आष्टीत बनावट मतदार नाव नोंदणी,—- •माजी आ. भिमराव धोंडे यांची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार —–

43

Beed dist @news

•आष्टीत बनावट मतदार नाव नोंदणी,—-

•माजी आ. भिमराव धोंडे यांची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार —–

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

आष्टी मतदारसंघात शेजारील जिल्ह्यातील मतदारांची बोगस कागदपत्रांच्या आधारे बनावट मतदार नावनोंदणी चालू आहे याची निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी माजी आ. भिमराव धोंडे यांनी केली आहे . याबाबत बीडचे जिल्हाधिकारी आणि राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे .
याबाबत राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रारीत माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, आष्टीच्या तिन्ही बाजूने अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे. या लगतच्या गावात मतदान वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीच्या काही निवडणुकीत मतदार वाढवून कार्यक्षेत्रा बाहेरील मतदारांनी मतदान केले होते . आष्टी विधानसभा मतदारसंघात प्रशासनाच्या सहकार्याने आवश्यक मतदानाची जुळवाजुळव करून बनावट कागदपत्रांच्या आधारे स्थानिक रहिवासी नसलेल्या बाहेरील मतदारांची नावे समाविष्ट करण्याचे काम सुरू आहे . नांव नोंदणी करणारे बी. एल. ओ. यांनी अशाप्रकारे संशयास्पद वाटणाऱ्या मतदारांची तसेच ज्या संशयित मतदारांनी ऑनलाईन मतदार नाव नोंदणी केली आहे त्यांची कागदपत्रे संबंधित बी. एल. ओ. यांनी खात्री करून घ्यावी व नांव नोंदणी करावी. तसेच बी. एल‌. ओ. यांनी यामध्ये काही चुकीची कामे केल्यास त्यांच्यावर देखील कडक कारवाई करण्यात यावी . बोगस मतदार नोंदणी बाबत उच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही प्रलंबित असून , तक्रारीच्या प्रती माहितीसाठी तहसीलदार आष्टी / प्रांताधिकारी पाटोदा यांना देण्यात आली असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे .