Home Breaking News Beed dist @news • दिल्ली सरकारच्या ओबीसी कमिशनच्या या वर्षीचा जीवन...

Beed dist @news • दिल्ली सरकारच्या ओबीसी कमिशनच्या या वर्षीचा जीवन गौरव पुरस्काराची घोषणा—- • कडा येथील श्रीराम महाविद्यालयातील प्रा.डॉ. मल्हारी जाधव यांचा स्वतंत्रता दिनानिमित्त यावर्षीचा जीवन गौरव पुरस्काराने होणार सन्मान — • श्रीराम महाविद्यालयाची मान उंचावली—

75

Beed dist @news

• दिल्ली सरकारच्या ओबीसी कमिशनच्या या वर्षीचा जीवन गौरव पुरस्काराची घोषणा—-

• कडा येथील श्रीराम महाविद्यालयातील प्रा.डॉ. मल्हारी जाधव यांचा स्वतंत्रता दिनानिमित्त यावर्षीचा जीवन गौरव पुरस्काराने होणार
सन्मान —

• श्रीराम महाविद्यालयाची मान उंचावली—

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

दिल्ली सरकार यांच्या ओबीसी कमिशनच्या वतीने स्वतंत्रता दिनानिमित्त दिला जाणारा यावर्षीचा -जीवन गौरव पुरस्कार life time
Achievement पुरस्कार महाराष्ट्रा मधून प्रा.डॉ.मल्हारी सैदु जाधव यांना देण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली .
प्रा.डॉ. मल्हारी सैदू जाधव हे आष्टी तालुक्यातील कडा येथील श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालयात वाणिज्य शाखेचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून , ,त्यांनी अनेक विविध विषयात संशोधन केले असून , लेख लिहिले , विविध स्पर्धा आयोजित करून सहभाग नोंदवुन उत्कृष्ट काम केले . ,प्रा.डॉ मल्हारी जाधव यांनी शैक्षणिक, सामाजिक उल्लेखनीय कामगिरी केली असून , .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण , आणि रोजगार वाढीसाठी व निर्मिती साठी नेहमी कार्यरत असतात . सामाजिक कार्य नेहमी चालु असून , विद्यार्थी / पालक यांच्याशी त्यांचा संपर्क आणि स्नेह दांडगा ,कायम आहे .
गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण ,समाजकारण आणि अर्थकारण या तिन्ही ची योग्य पद्धतीने सांगड घालुन शिक्षण पद्धती चालवतात विद्यार्थी प्रिय / शिस्तप्रिय शिक्षक म्हणून परिसरात नावलौकीक असून , .या सर्व कार्याची दखल घेत , ओबीसी कमिशन, दिल्ली सरकार यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले असून , हा पुरस्कार भव्य समारंभामध्ये ओबीसी कमिशनचे चेअरमन जगदीश यादव , ओबीसी कमिशन चे सचिव रणजित सिंग , (IAS)मनिका महाजन न्यायधीश, भरत झा,संदीप शर्मा, ओबीसी कमिशन सल्लागार समितीचे सदस्य अनुप चावला , संदीप महाजन यांच्या हस्ते प्रा.डॉ.मल्हारी सैदु जाधव यांना सन्मानित करण्यात येणार असल्याने , कडा येथील श्रीराम महाविद्यालयाची मान उंचावली असून या पुरस्काराबद्दल प्रा.डॉ.मल्हारी जाधव यांचे माजी आमदार भीमराव धोंडेसाहेब , डॉ.अजय (दादा) धोंडे , अँड. रत्नदीप निकाळजे, अँड. शेकडे , शिक्षण प्रसारक संस्थेचे सर्व प्रशासकीय अधिकारी , प्राचार्य. दानवे सर , उपप्राचार्य, प्रा. डॉ.संजय धोंडे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ चे सर्व प्राचार्य, उपप्राचार्य ,शिक्षकेतर सर्वकर्मचारी ,सामाजिक,
शैक्षणिक,राजकीय सर्व स्तरातील मान्यवर , मित्र परिवाराने अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .