Home Breaking News Varora taluka@ News • हिरालाल लोया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन...

Varora taluka@ News • हिरालाल लोया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना.

66

Varora taluka@ News
• हिरालाल लोया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना.

सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा:भारत शिक्षण संस्था ,वरोरा द्वारा संचालित हिरालाल लोया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,वरोरा येथे आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय व विद्यालय या दोन्ही विभागाचे मुख्य नियंत्रक म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक /प्राचार्य महेश डोंगरे तर विद्यालय विभागात सहाय्यक नियंत्रक म्हणून पर्यवेक्षक सौ.वीणा आंबटकर आणि वामन आसुटकर आहेत.

समितीचे प्रमुख नी.ओ.संचेती आणि उपप्रमुख स.दा. पावडे तसेच कनिष्ठ महाविद्यालय विभागात सहायक नियंत्रक प.का.पवार व उपप्रमुख कु.सुनीता मुळे तर समितीचे प्रमुख दी.वा.घुगल , तर उपप्रमुख स.आ.बोंडे तसेच सदस्य इतर शिक्षक वर्ग आहेत. या समितीचा मुख्य उद्देश हिरालाल लोया विद्यालयात शिक्षण घेण्याकरिता संपुर्ण तालुक्यातून जवळपास 90 गावातून विद्यार्थी रोज जाणे येणे करतात . वर्षभर त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचानिशी सामना करावा लागतो त्यामुळे अशा प्रसंगी विद्यालयाची आपत्ती व्यवस्थापनाची चमू त्यांना सहकार्य करतील.पावसाच्या दिवसात पुष्कळदा त्यांना शाळेतून परत जातांना अडचणी निर्माण होतात. अशावेळेस त्यांच्या अडचणी सोडविणे. विद्यार्थी घरी वेळेवर पोहचतात की नाही याची माहिती घेणे, पालक व शिक्षक यामध्ये समन्वय असणे .अडचणीच्या वेळेस विद्यालयात त्यांची व्यवस्था करणे. अशा प्रवासा दरम्यान व इतरही येणा-या अनेक समस्या लक्षात घेता शाळेचे मुख्याध्यापक श्री महेश डोंगरे सर यांच्या संकल्पनेतून शाळेत आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली.या समितीत एकूण वीस शिक्षक शिक्षिकांचा समावेश आहे.