Home Breaking News Ghugus city@ News • हजारो रुग्णांच्या चेहऱ्यावर सुधीरभाऊच्या जन्मदिनी फुलले हास्य ...

Ghugus city@ News • हजारो रुग्णांच्या चेहऱ्यावर सुधीरभाऊच्या जन्मदिनी फुलले हास्य • घुग्घुस येथील भव्य महाआरोग्य शिबिराचा 6113 रुग्णांनी घेतला लाभ

135

Ghugus city@ News
• हजारो रुग्णांच्या चेहऱ्यावर सुधीरभाऊच्या जन्मदिनी फुलले हास्य

• घुग्घुस येथील भव्य महाआरोग्य शिबिराचा 6113 रुग्णांनी घेतला लाभ

सुवर्ण भारत:पंकज रामटेके

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार ३० जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत घुग्घुस येथील केमिकल नगर वार्डातील प्रयास सभागृहात देवराव भोंगळे यांच्या पुढाकारातून व विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात भव्य महाआरोग्य शिबीर (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) चे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख पाहुणे म्हणून लॉयड्स मेटल्स कंपनी घुग्घुसचे युनिट हेड वायजीएस प्रसाद,लॉयड्स मेटल्स कंपनीचे उपाध्यक्ष मानव संसाधन प्रशासन पवन मेश्राम,एसीसी कंपनीचे एचआर हेड प्रफुल पाटील,चंद्रपूरचे सर्जन डॉ. दुधलवार, शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूरचे कॅम्प इन्चार्ज हर्षल मेंढे, डॉ. अजय ठाकरे, घुग्घुसचे डॉ. सुरेश कोल्हे, वेकोलि राजीव रतन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी पराग शंभरकर, कॅन्सर सर्जन नागपूरचे डॉ. आशिष भांगे, सामान्य रुग्णालय चंद्रपूरचे डॉ. भास्कर सोनारकर,भाजपाचे संजय तिवारी, निरीक्षण तांड्रा, संजय भोंगळे, चिन्नाजी नलभोगा, सिनू इसारप, प्रेमलाल पारधी मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन प्रज्ज्वलन करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या शिबिरात मेडिसिन तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, सर्जरी तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ, अस्थीरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ यांच्यातर्फे रक्तदाब, शुगर, ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कान, नाक, घश्याचे आजार, खाज, त्वचेचे विविध आजारांच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात तब्बल ६११३ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. ८६४ रुग्णांची निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. १२७१ रुग्णांना निःशुल्क चष्मा दिला जाणार आहे.औषधीचे वाटप करण्यात आले. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस सेवादिन म्हणून साजरा करीत, सुधीरभाऊंनी हजारो रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा घुग्घुस, राजुरा व पोंभूर्णा येथे राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि. प. चे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यातर्फे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

घुग्घुस व पोंभुर्णा येथील महाआरोग्य शिबिराचे हे सलग ९ वे वर्ष आहे तर राजुरा शहरात पहिल्यांदाच भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

संचालन साजन गोहने यांनी तर आभार प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी मानले.

यावेळी माजी जि. प. सभापती नितु चौधरी, भाजपाचे धनराज पारखी, जिल्हा सचिव विनोद चौधरी, संतोष नुने,विवेक (गुड्डू) तिवारी, गणेश कुटेमाटे, राजेश मोरपाका, रत्नेश सिंग, तुलसीदास ढवस, दिलीप कांबळे,सुनील बाम, सुरेंद्र भोंगळे, रवी चुने,अतुल चोखांद्रे,शरद गेडाम, गौरव ठाकरे, नितीन काळे, सचिन कोंडावार, विनोद जंजर्ला, हेमंत कुमार,पुजा दुर्गम, सुचिता लुटे, नंदा कांबळे, सरिता इसारप, सुषमा सावे, मल्लेश बल्ला, अमीना बेगम, सुनीता पाटील, सतीश बोन्डे, बबलू सातपुते, संकेत बोढे, आकाश लोहकरे, सुनील राम,मारोती मांढरे, प्रवीण सोदारी, हेमंत पाझारे,शंकर सिद्दम, श्रीकांत सावे, विल्सन आंबट,रोहित जैस्वाल, सुरेंद्र जोगी, गोविंद घोडके,विजय पचारे,वंदना नागवंशी, राखी डांगे, सुनीता घिवे, नाजमा कुरेशी, कुसुम सातपुते, लक्ष्मी नलभोगा,सुरेख डाखरे, माधुरी पेटकर मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.