Home Breaking News Ballarpur city@News • बल्लारशाह वनविभाग व रणरागीनी हिरकणी फाऊडेशन बल्लारपुर यांचे संयुक्त...

Ballarpur city@News • बल्लारशाह वनविभाग व रणरागीनी हिरकणी फाऊडेशन बल्लारपुर यांचे संयुक्त विद्यमाने ”एक पेड माँ के नाम’ कार्यक्रमाचे आयोजन • विविध धर्माचे धर्मगुरु व मान्यवराचे वृक्षरोपटे देऊन स्वागत

54

Ballarpur city@News
• बल्लारशाह वनविभाग व रणरागीनी हिरकणी फाऊडेशन बल्लारपुर यांचे संयुक्त विद्यमाने ”एक पेड माँ के नाम’ कार्यक्रमाचे आयोजन

• विविध धर्माचे धर्मगुरु व मान्यवराचे वृक्षरोपटे देऊन स्वागत

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर:वनरिक्षेत्र बल्लारशाह व रणरागीनी हिरकणी फाऊडेशन बल्लारपुर यांचे संयुक्त विद्यमाने २८ जुलै ला नियतक्षेत्र केम कक्ष क्र. ५७४ मध्ये एक पेड माँ के नाम अंतर्गत वृक्षरोपण करण्यात आले.

सर्व प्रथम रणरागीनी हिरकणी फाऊडेशन बल्लारपुर तर्फे कार्यक्रमाला उपस्थित विविध धर्माचे धर्मगुरु व मान्यवराचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला सिंधी समाज धर्मगुरु सुभाष जाग्यसी, हिंदु धर्माचे पंडीत गीत नारायण महाराज, पंजाबी समाजाचे प्रमुख पाठीजी, मुस्लीम समाजाचे मौलाना मोहम्मद इजहार, ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरु फादर जेम्स कुरुस्सरी, बौद्ध धर्मगुरु धम्मघोस मत्ता भंतेजी, एस.एन.डी.टी कॉलेजचे प्राचार्य डॉ. इंगोले, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह (प्रादे.) नरेश भोवरे, हिरकणी फाऊडेशन च्या अध्यक्षा श्रीमती सर्जना मुलचंदानी व हिरकणी युवामंच अध्यक्ष शुभम दवणे, हिरकणी फाऊडेशन च्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती नेहा भाटीया यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी मान्यवरांनी कार्यक्रमा बाबत जनजागृतीपर मार्गदर्शन केले. त्यानंतर वनक्षेत्रा मध्ये जाऊन धर्मगुरुच्या हस्ते एकतेचे प्रतीक ट्री ऑफ युनीटी म्हणुन वटवृक्षाची लागवड करुन वृक्षारोपनाची सुरुवात करण्यात आली.

सदर परिसरात २१०० रोपे लागवडीचे नियोजन करण्यात आले असुन टप्या-टप्याने बल्लारपुर शहरातील महाविद्यालय, व्यापारी संघटना, शासकिय यंत्रणा, सेवाभावी संस्था आणि पर्यावरण प्रेमी कडुन वृक्षारोपन केले जाणार आहे.

वृक्षारोपवन कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल परिसरातील जेष्ठ नागरीकांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कुमारी खुशी भाटीया यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बल्लारपुर येथील नागरीक उपस्थित होते. तसेच वनपरिक्षेत्र बल्लारशाह येथील वनकर्मचारी उपस्थित होते. नियतक्षेत्र केम कक्ष क्र.५७४ संत चावळा आय.टी.आय. चे जवळ असलेल्या वृक्षारोपन स्थळी येऊन वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन हिरकणी फाऊडेशन च्या संस्थापक अध्यक्षा नेहा भाटीया व वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश रामचंद्र भोवरे यांनी केले आहे.