Ballarpur city @news
• मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना समिती चंदनसिंह चंदेल यांची विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पदी निवड
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर : वनविकास महामंडळ चे माजी अध्यक्ष तथा भाजपा चे ज्येष्ठ नेते चंदन सिंह चंदेल यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने च्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवड केली
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील सनियंत्रण व आढावा समिती मध्ये चंदनसिंह चंदेल यांची विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांची समितीवर निवड करुन नवीन जबाबदारी देण्याचे निश्चित केले आहे. या समितीच्या अध्यक्षपदावरून महिलांच्या हितासाठी सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे महत्वपूर्ण कार्य करण्याचे विनंती केली.
सदर समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित राहुन विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त महिलांना या योजनाचा लाभ मिळवून देवून महिलांना सक्षम करण्याची संधी आहे.
तसेच पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटले की, कार्यक्षम व्यक्ती असून या जबाबदारीचे निर्वाहन समर्थपणे कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. सदर समितीच्या माध्यमातून लोककल्याणकारी कार्य आपल्या हातून घडतील अशी अपेक्षा बाळगली आहे.
