Home Breaking News विशेष लेख 🔲⬜नातं🔲⬜ 🏵️⬜वैशाली राऊत🏵️⬜ सहज सुचलं काव्यकुंज सदस्य नागपूर

विशेष लेख 🔲⬜नातं🔲⬜ 🏵️⬜वैशाली राऊत🏵️⬜ सहज सुचलं काव्यकुंज सदस्य नागपूर

258

विशेष लेख 🔲⬜नातं🔲⬜

🏵️⬜वैशाली राऊत🏵️⬜ सहज सुचलं काव्यकुंज सदस्य नागपूर

नातं या अडीच अक्षरी शब्दात किती अर्थ दडलेला आहे .थेट मनाचा मनाशी ,हृदयाचा हृदयाशी झालेला संवाद, आपुलकी, ओढ, भेटायची तीव्र इच्छा , सतत त्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा या सर्वांचा मिलाप म्हणजे नातं असावं. नात्याला कोणत्याही बंधनात बांधण्याची गरज पडत नाही आणि म्हणूनच राधेला किंवा मिरेला हा प्रश्न कधी पडलाच नसेल की आमचं श्रीकृष्णा सोबतचे नातं काय ? या नात्याला नाव काय नाव द्यावे?

नात्यात माझं तुझं किंवा अधिकार नसावा काही अपेक्षाही नसाव्या तेव्हाच ते नातं अतूट असू शकतं. भक्त भगवंताला पूर्णपणे शरण जातो. तो स्वतःच अस्तित्वच विसरून जातो आणि भगवंतातच स्वतःला शोधू लागतो. आपल्या जवळच्या प्रत्येक गोष्टीला तो भगवंताला समर्पित करतो .ही त्याची आस्था असते . एक भावनिक जवळीक असते त्याला तो कोणत्याही नात्यात बांधत नाही. आणि म्हणूनच असे निस्सीम भक्त कोणत्याही नात्यात गुंतत नाही तरी देखील भगवंताच्या थेट हृदयात असतात.

सामान्य व्यक्तीला मात्र असं वागता येत नाही किंबहुना हा विचारही त्याच्या मनात येत नाही .तो स्वतःला इतरांशी नेहमी नात्यात बांधण्याच्या प्रयत्नात असतो आणि त्यातच त्याला आनंद मिळतो.

नातं कोणतेही असो फक्त ते निरपेक्षपणे, इतरांच्या भावना समजून, त्यांची काळजी घेऊन बांधलेलं असावं म्हणजे त्या नात्याला तडा जाणार नाही आणि ते नातं चिरकाल टिकेल.