Chandrapur city@ News
• सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी!
•चंद्रपूरच्या समाजसेविका मुग्धा खांडे यांना आज पर्यंत तब्बल २१ पुरस्कार बहाल!
चंद्रपूर: किरण घाटे
चंद्रपूर शहरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रगणी असणाऱ्या समाजसेविका मुग्धा तरुण खांडे यांना आज पर्यंत सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तब्बल २१ पुरस्कार प्राप्त झाल्याचे त्यांनी आज सकाळी एका मुलाखती दरम्यान सांगितले.
खांडे या योग नृत्य परिवार ट्रस्ट चंद्रपूर जिल्ह्याच्या विद्यमान युवती अध्यक्ष असून त्यांनी या पूर्वी देखील ओबीसी युवती संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.
चंद्रपूर मनपाच्या माजी महापौर राखी कंचर्लावार व समाजसेविका माजी सभापती छबूताई वैरागडे यांचे वेळोवेळी आपणांस मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या समाजसेविका मुग्धा खांडे ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या एक जेष्ठ सदस्य आहेत.
सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे , अधिवक्ता मेघा धोटे या शिवाय सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार, प्रियंका गायकवाड, चित्रकार रश्मि पचारे, संयोजिका रंज्जू दिलीप मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार किरणदिप व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका कविता दिकोंडवार सहसंयोजिका लता बारापत्रे , भद्रावतीच्या व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्ष किरण साळवी, पुण्याच्या महिला पत्रकार स्नेहा मडावी , नाशिकच्या समाजसेविका चैताली आत्राम, लोकहितच्या शहराध्यक्ष अंजली इटनकर महिला कार्यकर्त्या अर्चना समर्थ, समता बन्सोड,व चंदा कामडी यांनी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे नेहमीच कौतुक केले आहे.
