Varora city @News
• वरोऱ्याची वैष्णवी बुरघाटे अखिल भारतीय आयुष स्नातक उत्तर प्रवेश परीक्षेमध्ये भारतातून दहावी टॉपर
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा : वैष्णवी शंकरराव बुरघाटे हिने आर ए. पोद्दार वैद्यक महाविद्यालय वरळी (मुंबई )याठिकाणी बी ए एम एस चे शिक्षण पूर्ण केले. पुढील एम डी शिक्षणासाठी आयुर्वेदा चा चार वर्षाचा सिलॅबस पूर्ण करून मुंबई सेंटर मधून अखिल भारतीय आयुष स्नातक उत्तर प्रवेश परीक्षा दिली. या परीक्षेत एकूण 480 गुणांपैकी 378 गुण प्राप्त करून संपूर्ण भारत देशातून दहाव्या क्रमांकानी टापर आली असून ओ बी सी कॅटेगरी मध्ये तिसरी रँक आहे. वैष्णवी च्या यशाने कुटुंब भारावून गेले असून सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.
वरोरा शहरातील शिवाजी वॉर्ड, आंबेकर ले आऊट मधील रहिवासी शंकरराव बुरघाटे यांची वैष्णवी ही मुलगी आहे. वैष्णवीचे वडील विदर्भ कोकण बँक शाखा घुग्गुस येथे व्यवस्थापक या पदावर कार्यरत असून आई ही गृहिणी आहे.वैष्णवी चे प्राथमिक शिक्षण दहावी पर्यंत लोकमान्य कन्या विद्यालय वरोरा,अकरावी , बारावी दिशा एज्यूपॉईंट वरोरा येथे तर ग्रॅज्यूएशन आणि पुढील शिक्षण आर ए पोद्दार वैद्यक महाविद्यालय येथे बी ए एम एस चे शिक्षण घेतले. एम डी साठी चार वर्षाचा सिल्याबस पूर्ण करून अखिल भारतीय आयुष स्नातक उत्तर प्रवेश परीक्षा दिली. यामध्ये 480 गुणांपैकी 378 गुण घेऊन संपूर्ण भारतातून दहावा क्रमांक घेऊन यशाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला. पुढे तिचे ध्येय आहे की सर्जरी किंवा प्रसूती तंत्र म्हणुन आपण जवळच्या महाविद्यालयात काम करण्याची मनीषा यशोमयी वैष्णवी ने बोलून दाखविली.
वैष्णवीच्या यशोमयी उत्तुंग भरारीने वरोरा शहर आणि तालुक्याचा मान सन्मान वाढला असून वैष्णवीचे यश हे वरोऱ्यासाठी भूषणावह ठरले आहे.आपल्या यशाचे श्रेय आई, वडील आणि मार्गदर्शक व्याख्याता यांना दिले आहे.
