Ballarpur city@ News
• बल्लारपूर नगरीतील रस्ते ऐकवितात आपली करुण कहाणी
•पाच वर्षां पूर्वी बनलेले “CC रोड” फुटले ; जागो-जागी “पेवर्स” दबले यांस प्रामुख्याने जबाबदार कोण ?
रवि पुप्पलवारांचा सवाल
सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर:बल्लारपूर शहरात पाच वर्षांपूर्वी कोंट्यावधी रुपये खर्च करून नवीन CC रोड बनविण्यात आले होते .
शहरात सौंदर्यीकरणाच्या नावाने रोडच्या लगत पेवर्स बसविण्यात आले होते परंतु आता या रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. जागोजागी रोड फुटले आहेत , पेवर्स दबले आहेत. अतोनात पैसा खर्च करून बनविलेले रोड पाईपलाईन आणि वायरींगसाठी फोडलेली आहेत . अश्या फोडलेल्या मुख्य रस्त्याकडे गर्भश्रीमंत ठेकेदार, सबंधित अधिकारी व बल्लारपूर शहरातील अनेक संघटना तद्वतच पक्षांचे नेतेही दुर्लक्ष करतांनाही दिसत आहेत. असा आरोप आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी केला आहे.
सामान्य जनतेला तर नळाचे पाइप लाइन टाकण्यासाठी नगरपरिषद रोड रिस्टोरेशन साठी पैसे मोजायला लावते तेव्हाच नाहरकत प्रमाणपत्र नागरिकांना देण्यात येते. तर अश्याचप्रकारे पाईपलाईन आणि वायरींगसाठी फोडले गेलेल्या रोडांसाठी रिस्टोरेशनचे पैसे घेतले जात नाही का.? नाही तर मग ही व्यवस्था सामान्य जनतेवरच का.? असे प्रश्न ही पुप्पलवार यांनी मांडले आहे. जर ठेकेदाराकडून किंवा संबंधित विभागाकडून रिस्टोरेशनचे पैसे घेतले जात असेल तर त्या फुटलेल्या रस्त्यांकडे दुर्लक्ष का केले जात आहे? असा सवाल देखील पुप्पलवार यांनी उपस्थित केला.