Home ब्रम्हपुरी Varora city @News • पुण्याई फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना भोजनदान व वृक्षारोपण

Varora city @News • पुण्याई फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना भोजनदान व वृक्षारोपण

154

Varora city @News

• पुण्याई फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना भोजनदान व वृक्षारोपण

सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : येथील पुण्याई फाउंडेशन ग्रुप व हरित मित्र परिवारा तर्फे तालुक्यातील मोहबाळा येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. तसेच स्मशानभूमी मध्ये अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रम ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष प्रकाश शामराव खरवडे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला.

या कार्यक्रमाला मोहबाळा ग्रामपंचायत सरपंच नंदू टेमुर्डे , उपसरपंच शेवंताबाई मोडक, ग्रामपंचायत सदस्य दिनेश काळे, वरोरा येथील माजी नगरसेवक छोटू शेख, किशोर उत्तरवार यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते . सदर कार्यक्रम मोहबाळा येथील समाज मंदिरामध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय कामगार संघटना अध्यक्ष राजेंद्र जुगनाके यांनी केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष देविदास ताजने, रवि खुडाळकर, सतीश थेरे , सुमित वनकर , संजय राजुरकर , निलेश आंबुरकर , अभय ठेंगणे , आशिष घुमे , रितिक पारखी, श्रीकृष्णा शेंडे , नितेश नन्नवरे , सुनील झिलगिलवार, दिलीप वराटे, गुड्डू सर्वे , सर्व शिक्षक व शिक्षिका या सर्वांनी कार्यक्रमाला सहकार्य केले. उपस्थितांचे आभार पुण्याई फाउंडेशन प्रसिद्धीप्रमुख दीपक मते यांनी मानले.