Home Breaking News Wardha Dist@News • उड्डाण पुलावर होणाऱ्या अपघातास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार •एम.आय.एम....

Wardha Dist@News • उड्डाण पुलावर होणाऱ्या अपघातास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार •एम.आय.एम. चे शहराध्यक्ष आसिफ खान यांचा आरोप

112

Wardha Dist@News
• उड्डाण पुलावर होणाऱ्या अपघातास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार
•एम.आय.एम. चे शहराध्यक्ष आसिफ खान यांचा आरोप

सुवर्ण भारत:अर्पित वाहाणे

वर्धा :एम.आय. एम.चे जिल्हा प्रभारी तथा शहराध्यक्ष आसिफ खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला मे महिन्यातच आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे निवेदन देऊन, पावसाळा सुरू होण्याच्या आधीच पुलावरील गड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी केली होती.

मागणीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटुन पाठ पुरावा केला.
पण गेंड्याची कातडी सारख्या निगरगट्ट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याची कोणतीच जाणीव झाली नाही, याच दरम्यान आसिफ खान यांचा उड्डाण पुलावर गड्डयातून गाडी उसळून मोठा अपघात झाला, उड्डाण पुलावरील अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्या कारणाने आसिफ खान यांनी सबंधित विभागाच्या विरोधात पोलिस स्टेशन वर्धा येते रीतसर पोलिस तक्रार सुधा दाखल केली.
आसिफ खान यांनी या संदर्भात आंदोलनाची भुमिका घेतली असता उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे नाममात्र चाल चलाऊ डाग डुजी केल्याचे आढळून आले. आज घडीला या डाग डूजी मुळे उड्डाण पुलावरील स्थिती अजुन बिकट झाली असून रोज अपघात घडत आहे.
या दैनंदिन होणाऱ्या अपघातास सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार राहील.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याची तीळ मात्र जाणीव नसुन येत्या आठ दिवसात जर या उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम झाले नाही तर, एम.आय.एम रास्ता रोको आंदोलन आणि वेळ प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन सुधा करणार, अशी भुमिका घेण्याची आमची तयारी असल्याची माहिती आसिफ खान यांनी दिली.