Home Breaking News Beed dist @news •मतदारांनी साथ दिल्यामुळेच मी मतदारसंघाचा विकास करु शकलो-...

Beed dist @news •मतदारांनी साथ दिल्यामुळेच मी मतदारसंघाचा विकास करु शकलो- माजी आ. भीमराव धोंडे •मी आमदार असताना लोणी, पिंपळा,साकत परिसरातील अनेक विकासकामे केली:माजी आ. भीमराव धोंडे

115

Beed dist @news

•मतदारांनी साथ दिल्यामुळेच मी मतदारसंघाचा विकास करु शकलो- माजी आ. भीमराव धोंडे

•मी आमदार असताना लोणी, पिंपळा,साकत परिसरातील अनेक विकासकामे केली:माजी आ. भीमराव धोंडे

सुवर्ण भारत : गोरख मोरे 
बीड जिल्हा प्रतिनिधी

मी माजी असुनही माझ्या वाट्याला माणसांचे वैभव आले आहे त्यामुळे स्वःताला भाग्यवान समजतो .चार वेळा विधानसभा सदस्य होतो . या वीस वर्षांच्या काळात लोणी , साकत व पिंपळा परिसरातील अनेक विकासकामे मी आमदार असतानाच करण्यात आली असून , सर्व कामे दर्जेदार व टिकाऊ केली आहेत , तसेच मतदारसंघातील मतदारांनी साथ दिल्यामुळेच मी मतदारसंघाचा विकास करु शकलो असल्याचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी लोणी, पिंपळा व साकत येथे झालेल्या जनसंपर्क अभियान दौऱ्याच्या प़सगि बोलताना सांगितले .
आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आ. भीमराव धोंडे यांनी मंगळवारी दिनांक ६ ऑगस्ट रोजी जनसंपर्क अभियाना अंतर्गत आष्टी तालुक्यातील नांदूर , धनगरवाडी, पिंपळा, साकत, लोणी सय्यदमीर गांवाचा व परिसरातील वाड्या वस्त्यावर फिरून लोकांच्या भेटी घेऊन संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या .दौऱ्याच्या निमित्ताने माजी आ. भीमराव धोंडे यांचे ठिकठिकाणी वाजतगाजत व तोफा वाजवुन जोरदार स्वागत करण्यात आले , असून वीस दिवसांपासून सुरू केलेल्या अभियानामध्ये माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आतापर्यंत आष्टी, पाटोदा, कडा, शिरूर, धामणगाव, अंमळनेर , पिंपळवंडी या गावाचा दौरा केला . लोणी गटातील दौऱ्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून , दौऱ्याच्या निमित्ताने मा. पं. स. सदस्य संजय धायगुडे, माजी सरपंच चंद्रशेखर साके, प्रा. दादा विधाते, उपसरपंच रामा देवकर, युवा मल्हार सेनेचे युवराज खटके, चंदु शेंडगे, सचिन सुंबे, माजी पं. स. सदस्य दिगंबर मेहेत्रे, भैरवनाथ खांदवे व इतर कार्यकर्ते सोबत होते .
नांदूर विठ्ठलाचे, धनगरवाडी,पवार वस्ती, पिंपळा येथील मातंग वस्ती ( लोखंडे ), तिरमली वस्ती, बौद्ध विहार, पवार वस्ती, मेहेत्रे वस्ती, सुंबेवाडी,भवर वस्ती, लोणी सय्यदमीर येथील भोसले वाडा ( बुद्ध विहार ), परिसरातील अनेक वस्त्यांवर भेटी दिल्या असून , गावात फिरून व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या त्याचप्रमाणे साकत गावात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या .
वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बैठकीत मा‌‌. आ. भिमराव धोंडे यांनी सांगितले की, आपल्या शिक्षण संस्थेत सर्व जाती धर्माचे शिक्षक व इतर कर्मचारी कार्यरत आहेत , मी कधीही भेदभाव कधी केला नाही . पिंपळा येथे पिंपळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान व वाणिज्य शाखा लवकरच सुरू करण्यात येणार असून , ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करता आली याचा मला आनंद आहे . भविष्यात माझ्या सोबत रहा उर्वरित रस्त्यांची व इतर विकासकामे पूर्ण करु,
सुंबेवाडी येथे कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली असून , मी कोणत्याही कामात कधीही कमिशन घेतले नाही, अलिकडच्या काळात दर्जेदार कामे होत नाहीत. भविष्यात चांगला विकास करण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन मा. आ. धोंडे यांनी केले . वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बैठकीत सरपंच राजेंद्र खुरंगे, माजी सरपंच धनराज गावडे, माजी सरपंच चंद्रशेखर साके, युवराज खटके, माजी पं‌. स. सदस्य संजय धायगुडे, दशरथ शिंदे, प्रा. दादा विधाते, माजी उपसरपंच महादेव शेळके, ग्रा. पं. सदस्य आजिनाथ थोरात, माजी सरपंच मुरलीधर भोगाडे व इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले. दौऱ्याच्या निमित्ताने हरिभाऊ शेंडगे, माजी ग्रा. पं. सदस्य जगन्नाथ अरुण, मुबारक सय्यद, सुर्यकांत शिंदे,माजी उपसरपंच दशरथ शिंदे, प्रविण मेहेत्रे, दादासाहेब काकडे, ग्रा. पं. सदस्य संदीप निंबोरे, संजयदादा खटके, माणिक खटके, विष्णू खटके, महावीर सुराणा , माजी ग्रा.पं. सदस्य बाळकृष्ण भवर, लोणी येथील शंकरराव राजे निंबाळकर, तुकाराम बेल्हेकर, रामदास बेल्हेकर, बाळासाहेब सावरे, गणेश निकम, ग्रा. पं . सदस्य सुभाष सासवडे, रामदास जाधव,उद्धव गोरे,दादा सांगळे, ह.भ.प. रामदास रक्टाटे महाराज,संतोष बेल्हेकर, बबन सावरे, यशवंत देवकर,मोहनराव पोकळे यांच्या निवासस्थानी तसेच रक्टाटे बंधू यांच्या हाॅटेल शिवांशला, शिव मल्हार ऍटोमोबाईलला भेट दिली. नांदूर येथील रमेश कुलांगे यांच्या मातोश्रीचे नुकतेच निधन झाले, बाळू पवार यांच्या मातोश्री तुळसाबाई जगन्नाथ पवार यांचे निधन झाले, पिंपळा येथील रामराव सोनवणे यांचे निधन झाले, दिगंबर बेल्हेकर यांच्या मुलाचे निधन झाले होते तसेच
मोहन मंजाबापु रक्टाटे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सावरे वस्तीवरील लहान मुलाचे निधन झाले होते त्यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांत्वन केले. ठिकठिकाणी सरपंच संजय विधाते,सरपंच राजेंद्र खुरंगे, माजी सरपंच धनराज गावडे, ह.भ.प. राऊत दादा महाराज, ईश्वर गव्हाणे, शरद मेरगळ, उपसरपंच परसराम पवार, बाजीराव भांड, बापुराव येडे, दिलावर तांबोळी,जयराम लोखंडे, चंदु लोखंडे, भानुदास फुलमाळी, अमीर सय्यद, मारुती मुळे, दत्तात्रय भवर, जनार्दन भवर, मुबारक सय्यद, ज्ञानदेव खटके, सचिन सुंबे, उपसरपंच पप्पु गवळी,परसराम विधाते, कैलास गवळी, नरहरी विधाते,दत्ता विधाते,अमृत खिळदकर, माजी उपसरपंच दशरथ शिंदे, जगन्नाथ अरुण, ग्रामपंचायत सदस्य सतिष अरुण, चंद्रकांत अरुण, अशोक शिंदे, कांतीलाल पवार,गोरख मुळे, भाऊसाहेब दुर्गे, कुंडलीक देवकर, संजय दुर्गे, भैरवनाथ खांदवे, नवनाथ साके,भगवान शेळके, धोंडीभाऊ शेळके, चेअरमन आजिनाथ साबळे, दत्तोबा शेळके, नारायण पवार, केदारे मेजर,राधेश बेल्हेकर, आकाश खोमने, ग्रा. पं. सदस्य अक्षय सावरे, गणेश पवार, उपसरपंच रामदास देवकर, संतोष व्यावहारे, ग्रा. पं. सदस्य सुभाष दादा भोसले, अमोल पवार, बजरंग सांगळे, जालिंदर शिरोळे, बाबा भोसले, उत्तम वाळके, ग्रा. पं. सदस्य चंद्रकांत सावरे, अभय भोसले, गणेश मुर्तीकार संतोष शिंदे, दिलीप रक्टाटे, उत्तम वाळके,छबुराव भोगाडे, माजी सरपंच मुरलीधर भोगाडे,सुर्यभान शिंदे, ग्रा. पं. सदस्य आजिनाथ थोरात, राजु शिंदे, रामभाऊ भोगाडे, विठ्ठल वाघ इत्यादींनी माजी आमदार भीमराव धोंडे यांचे स्वागत केले .

पिंपळा व साकत येथील अनुक्रमे मारुती मुळे व माजी सरपंच मुरलीधर भोगाडे या दोन्ही जेष्ठ नागरीकांनी माजी आमदार भिमराव धोंडे यांचे तोंड भरून कौतुक केले कारण की त्यांच्या मुळेच या भागाचा खरा विकास झाल्याचे या दोघांनी अत्यंत पोटतिडकीने सांगितले. पिंपळा येथील सौ. रुक्मिणीबाई मारुती मुळे यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने भिमराव धोंडे यांच्या हातात राखी बांधली व खुप मोठे व्हा असा आशिर्वाद दिला. मारुती मुळे व भोगाडे हे अनेक वर्षांपासून भिमराव धोंडे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत .