Home Breaking News Beed dist @news •टाकळसिंग येथे माजी आ. भीमराव धोंडे यांची घोड्यावरून मिरवणुक-...

Beed dist @news •टाकळसिंग येथे माजी आ. भीमराव धोंडे यांची घोड्यावरून मिरवणुक- •तर सांगवीत जेसीबीतुन फुले उधळत केले जोरदार स्वागत-

200

Beed dist @news
•टाकळसिंग येथे माजी आ. भीमराव धोंडे यांची घोड्यावरून मिरवणुक-
•तर सांगवीत जेसीबीतुन फुले उधळत केले जोरदार स्वागत-

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या जनसं पर्क अभियान दौऱ्याच्या निमित्ताने बुधवारी आष्टी तालुक्यातील (जिल्हा बीड) टाकळसिंग येथे कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात भीमराव धोंडे यांची घोड्यावरून मिरवणूक काढली , तर सांगवी आष्टी येथे जेसीबीतुन फुले उधळत जोरदार स्वागत करण्यात आले .
याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आ. भीमराव धोंडे यांनी मंगळवारी दिनांक ७ ऑगस्ट रोजी जनसंपर्क अभियाना अंतर्गत आष्टी तालुक्यातील टाकळसिंग, हिंगणी,सांगवी आष्टी, खडकत, बळेवाडी, पारगाव, वाळुंज, चिखली गांवाचा दौरा करीत लोकांच्या भेटी घेऊन संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या . दौऱ्याच्या निमित्ताने माजी आ. भीमराव धोंडे यांचे ठिकठिकाणी वाजतगाजत व तोफा वाजवुन जोरदार स्वागत करण्यात आले . अभियानामध्ये माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आतापर्यंत आष्टी, पाटोदा, कडा, शिरूर, धामणगाव, अंमळनेर , पिंपळवंडी, लोणी सय्यदमीर , पिंपळा, साकत या गावाचा दौरा केला. बुधवारी झालेल्या दौऱ्याच्या निमित्ताने संभाजी जगताप, ॲड. मोहनराव खेडकर, भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे , दत्तात्रय आनेराव, अस्ताक शेख, हादी शेख व इतर कार्यकर्ते सोबत होते .
विविध ठिकाणी झालेल्या बैठकीत मा. आ. भिमराव धोंडे यांनी सांगितले की, टाकळसिंग येथील जनतेने माझ्यावर खुप प्रेम केले आहे. माझी घोड्यावर मिरवणूक काढली याचा मला खुप आनंद वाटला. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करीत जादा उत्पन्न घ्यावे. अलीकडच्या काळात शेतकरी फळबागेकडे वळले आहेत. विधानसभा सदस्य असताना मी टाकळसिंग गावात अनेक पाझरतलाव केले आहेत मतदारांनी कोणत्याही निवडणुकीमध्ये स्वाभिमान विकु नये, लोकांसाठी मी दिल्लीपर्यंत पायी मोर्चा काढला. सांगवी आष्टी गावाने देखील मला अनेक वेळा मोलाचे सहकार्य केले. उर्वरित विकास करण्यासाठी भविष्यत मला सहकार्य करण्याचे आवाहन भिमराव धोंडे यांनी केले. पारगाव जोगेश्वरी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास धोंडे यांनी भेट दिली. टाकळसिंग येथील पंचशिलनगर व अण्णाभाऊ साठे चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वाळुंज व चिखली येथील अनुक्रमे भैरवनाथ व लक्ष्मीमातेचे दर्शन घेतले. वेगवेगळ्या गावात झालेल्या छोटेखानी बैठकीत रंगनाथआण्णा जगताप, ॲड. मोहनराव खेडकर, लालाभाऊ कुमकर, संभाजी जगताप, गोरख महाराज झांबरे, सरपंच संभाजी झांबरे,
किसनराव खेडकर, माजी सरपंच तात्यासाहेब कदम, निखिल खेडकर, रघुनाथ शिंदे व इतरांनी मनोगत व्यक्त केले. दौऱ्याच्या निमित्ताने जेष्ठ नेते बबनराव झांबरे,पै. निलेश जगताप, दत्तु मदने, शाहरुख तांबोळी, सुनिल सिताराम पवार, सोपान उदमले, बाळासाहेब मानकेश्वर, हनुमंत क्षीरसागर, पोलीस बाॅईज संघटनेचे वजीर पठाण, सुधीर पारखे यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या .
टाकळसिंग येथील अली शेख यांचा मुलगा सोहेलचे निधन झाले तसेच चिखली येथील कै. दादा घोलप यांचे दुःखत निधन झाले. ईमनगाव येथील कै. नारायण एकनाथ जरांगे यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या कुटुंबीयांचे मा. आ. भिमराव धोंडे यांनी सांत्वन केले. ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमास जेष्ठ नेते लालाभाऊ कुमकर,सरपंच संभाजी झांबरे, काकासाहेब शिंदे, कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आण्णासाहेब लांबडे, रंगनाथ आण्णा जगताप,पी. के. कुमकर,तात्याभाऊ जगताप, डॉ‌. पठाडे, विश्वंभरबापु जगताप, झुंबर कुमकर,रघुनाथ शिंदे, दादासाहेब जगताप, लक्ष्मण ओव्हाळ, सरपंच संदीप खेडकर,उपसरपंच अंकूश खेडकर, सुनिल सिताराम पवार, कांताराव खेडकर, नवनाथ खेडकर, कैलास सावंत, सुधीर पारखे, प्रकाश कोकणे, भागवत तांबे, संतोष गोयकर, शिवाजी कोकणे, राजेंद्र राऊत, रावसाहेब शिंदे, दिगंबर शिंदे,निळकंठ खेडकर, संपत खेडकर, अंबादास खेडकर, सुरेश खेडकर, महेंद्र खेडकर,पांडुरंग खेडकर,इस्माईल तांबोळी,कैलास जोगदंड, संजय जोगदंड ,विकास जोगदंड , रासपचे लक्ष्मण भिसे, दादासाहेब भोसले, माजी सरपंच नामदेव कदम, ॲड. शेख, विनोद कदम, कुंडलिक मोकाशे, महमंद बेग, महारुद्रा भोसले, तात्यासाहेब कदम, विनोद कदम, बबन झगडे, राजेंद्र भोराडे, बाशाभाई शेख, दत्तात्रय भोराडे, संजय गुरव, दादा साळवे, बन्सी मोकाशे, बबन महाराज बळे, कारभारी भोसले , अशोक भोसले, भागवत भोसले, विठ्ठल भोसले, सोमिनाथ शिंदे, पांडुरंग बळे,वजीर पठाण, अजय जोगदंड, निखिल जोगदंड, शिवाजी चखाले आदी जन या प्रसंगी उपस्थित होते .