Home Breaking News Chandrapur dist@News •लाचखोर कनिष्ठ लिपीक अडकला चंद्रपूर ACB च्या जाळ्यात! अर्जित...

Chandrapur dist@News •लाचखोर कनिष्ठ लिपीक अडकला चंद्रपूर ACB च्या जाळ्यात! अर्जित रजेच्या नोंदी प्रमाणित करण्यासाठी मागितली होती लाच !

210

Chandrapur dist@News
•लाचखोर कनिष्ठ लिपीक अडकला चंद्रपूर ACB च्या जाळ्यात!

अर्जित रजेच्या नोंदी प्रमाणित करण्यासाठी मागितली होती लाच !

चंद्रपूर :किरण घाटे

अर्जित रजेच्या नोंदी प्रमाणित करण्यासाठी एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकास लाचेची मागणी करणा-या कनिष्ठ लिपीकास आज चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने चांगलाच धडा शिकवत त्यास लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
या लाचखोर कनिष्ठ लिपीकाचे नांव मोहम्मद अकील इस्माईल शेख असे असून तो चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील वाढोणास्थित समाजसेवा विद्यालयात कनिष्ठ लिपीक या पदावर कार्यरत होता.
सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचे काम झटपट करुन देण्यासाठी या लाचखोर लिपीकाने चक्क १५हजार रुपयांची मागणी केली होती.नंतर हा सौदा तीन टप्प्यांत देण्याचा झाला . पहिल्याच टप्प्यातील लाचेची पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना लिपिक चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अलगद अडकला !या लाचखोरासोबतच एका खासगी व्यक्तीला देखील अटक करण्यात आली असल्याचे समजते.

सदरहु कारवाई पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक मंजूषा भोसले यांच्या नेतृत्त्वात पोलिस निरीक्षक जितेंद्र गुरनूले व त्यांच्या पथकांनी यशस्वीपणे केली.

घटनेचे वृत्त कळताच जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली !दरम्यान अनेकांनी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.