Home Breaking News Varora taluka@ news • सुजाता कांबळे ‘सेट ‘ परीक्षा उत्तीर्ण

Varora taluka@ news • सुजाता कांबळे ‘सेट ‘ परीक्षा उत्तीर्ण

511

Varora taluka@ news
• सुजाता कांबळे ‘सेट ‘ परीक्षा उत्तीर्ण

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा: तालुक्यातील संत तुकडोजी विद्यालय, टेमुर्डा येथे शिक्षिका पदावर कार्यरत असलेल्या सुजाता जनार्दन कांबळे यांनी वरिष्ठ महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा अर्थशास्त्र या विषयात उत्तीर्ण केली आहे. यापूर्वी सुजाता कांबळे यांनी राज्यशास्त्र विषयात सदर परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे.
सुजाता कांबळे ह्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून परिचित आहेत. लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्याकारणाने विवाह नंतर नोकरी आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळली. विवाहानंतर शिक्षण न थांबविता जिद्द,मेहनत व चिकाटीने ते सुरु ठेवत बी. ए. (इंग्रजी वांड्मय), एम. ए. ( राज्यशास्त्र , अर्थशास्त्र ) बी.एड. अशा प्रकारे पदव्या त्यांनी संपादन केल्या असून सध्या त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथे राज्यशास्त्र या विषयांमध्ये पीएचडी पदवीचा अभ्यास करत आहेत.
शिक्षणाबरोबरच त्यांनी समाजसेवेची आवड जोपासलेली असून अनेक ठिकाणी त्यांचे व्याख्याने आणि उत्कृष्ट सूत्रसंचालनसाठी प्रसिद्ध आहेत. विवाहानंतर त्यांनी नोकरी, समाजसेवा, घर सांभाळून त्या आपली अभ्यासाची आवड जोपासत आहेत. विद्यार्थी व समाजापुढे आदर्श निर्माण करत आहेत. अर्थशास्त्र विषयामधील सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.