Home Breaking News Gadchiroli dist@ News •Aheri@मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकार 17 जणांना मिळाली...

Gadchiroli dist@ News •Aheri@मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकार 17 जणांना मिळाली दृष्टी

43

Gadchiroli dist@ News
•Aheri@मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकार 17 जणांना मिळाली दृष्टी

सुवर्ण भारत:शंकर महाकाली ( संपादक)

अहेरी:दुर्गम भागातील गोर गरिबांना विविध आजारांवर शहरात जाऊन उपचार घेणे शक्य नसल्याने मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात ‘मावा स्वास्थ्य मावा अधिकार’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील रुग्णांची शोध घेऊन योग्य उपचार व औषधोपचार केले जात आहे. दरम्यान अनेक वयोवृद्ध आणि इतर नागरिकांमध्ये नेत्रदोष आजार दिसून आल्याने या रुग्णांना एकाच दिवशी व एकाच ठिकाणी योग्य उपचार व सल्ला मिळावा या उदात्त हेतूने यांनी ४ ऑगस्ट रोजी अहेरी येथील इंडियन फंक्शन हॉल येथे भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.यात बरेच गोर गरीब वयोवृध्द नागरिकांना मोतीबिंदू खराब झाल्याचे निष्पन्न झाले.
ज्यांना शस्त्रक्रियेची गरज होती अश्या नेत्रविकार असलेल्या रुग्णांना नागपूर पाठवून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून परत दृष्टी मिळवून दिले आहे. त्या 17 जणांनी अहेरी येथील राजवाड्यात येऊन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची भेट घेऊन आभार मानले.