Home Breaking News Gadchiroli dist@ News • शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवा;मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे...

Gadchiroli dist@ News • शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवा;मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन • लगाम येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न

58

Gadchiroli dist@ News
• शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवा;मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन

• लगाम येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

मुलचेरा:शासनाच्या विविध योजना केवळ कागदावर न राहता त्या सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे,असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

मुलचेरा तालुक्यातील लगाम येथे मंगळवारी भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम,जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,लगामचे सरपंच दिपक मडावी,राकॉचे जेष्ठ कार्यकर्ते अमित मुजुमदार,सुशील खराती,येल्ला उपसरपंच दिवाकर उराडे,माजी पंचायत समिती सभापती नामदेव कुसनाके,सत्यवान सिडाम, विकास घरामी,सपण डे,बालाजी सिडाम,मनोहर मारटकर,अरविंद सोयाम,नरेश राऊत,ईश्वर उरेते,दिलीप मंडल, सिडाम सर,शैलेन बेपारी,निखिल सिकदार, तेजेन मंडल,गोविंद बिश्वास,विकास मंडल आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सर्वसामान्यांचा कल्याणासाठी विविध शासकीय योजना राबविण्यात येत आहे. महायुतीच्या माध्यमातून त्यात आणखी भर टाकण्यात आला असून मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण योजना’,’लेक लाडकी योजना’,मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण-शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र,औषधनिर्माण शास्त्र, वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित ८ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के प्रतिपूर्ती, राज्यातील अंगणवाडी सेविकांना, मदतनीस,मिनी अंगणवाडी सेविका यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू यासाठी एक लाख रुपये इतका लाभ दिला जात आहे.ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटाच्या निधीत १५ हजारावरून ३० हजारापर्यंत वाढ करण्यात आले.महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत आतापर्यंत १५ लाख महिला ‘लखपती दीदी’ या वर्षात २५ लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट आणि महत्वाचा म्हणजे लाडक्या भावांना सुद्धा लाभ देण्याचा काम महायुतीच्या माध्यमातून केला जात आहे.या सर्व योजना सर्वसामान्यांना सक्षम करण्यासाठी असून शेवटच्या घरापर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी शासन तर कटिबद्ध आहेच.मात्र कार्यकर्त्यांनी देखील यासाठी विषेश प्रयत्न करावे असे आवाहन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

दरम्यान लगाम येथे आगमन होताच कार्यकर्त्यांनी मंत्री आत्राम यांचे जंगी स्वागत केले.लगाम परिसरातील विविध गावातील कार्यकर्त्यांनी परिसरातील समस्या सांगितले तर काही कार्यकर्त्यांनी समस्यांचे निवेदन दिले.यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून तात्काळ समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.यावेळी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.