Home Breaking News Gadchiroli dist@News • ‘त्या’ अभिनव उपक्रमाने १७ जणांना मिळाली दृष्टी मंत्री धर्मराव...

Gadchiroli dist@News • ‘त्या’ अभिनव उपक्रमाने १७ जणांना मिळाली दृष्टी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा पुढाकार • अहेरीत तपासणी अन् नागपुरात शस्त्रक्रिया

58

Gadchiroli dist@News
• ‘त्या’ अभिनव उपक्रमाने १७ जणांना मिळाली दृष्टी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा पुढाकार

• अहेरीत तपासणी अन् नागपुरात शस्त्रक्रिया

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

अहेरी:-घरी अठराविश्‍व दारिद्रय, मजुरी केल्याशिवाय पोटाची खळगी भरता येईना.अश्यात वार्धाक्यात थकलेल्या शरीराला अनेक व्याधी. त्यात अनेक दिवसांपासून मोतीबिंदू खराब झाल्याने डोळ्याला काहीच दिसेना. काळजाला पाझर फुटावी, अशी व्यथा अश्या अनेक अडचणीत असलेल्यांना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यामुळे तब्बल १७ जणांना दृष्टी मिळाली आहे.

दुर्गम भागातील गोर गरिबांना विविध आजारांवर शहरात जाऊन उपचार घेणे शक्य नसल्याने मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात ‘मावा स्वास्थ्य मावा अधिकार’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत खेड्यापाड्यातील रुग्णांची शोध घेऊन योग्य उपचार व औषधोपचार केले जात आहे. दरम्यान अनेक वयोवृद्ध आणि इतर नागरिकांमध्ये नेत्रदोष मोतीबिंदू सारखे आजार दिसून आल्याने या रुग्णांना एकाच दिवशी व एकाच ठिकाणी योग्य उपचार व सल्ला मिळावा या उदात्त हेतूने माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम तसेच त्यांची अर्धांगिनी डॉ.मिताली आत्राम यांनी ४ ऑगस्ट रोजी अहेरी येथील इंडियन फंक्शन हॉल येथे भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.यात बरेच गोर गरीब वयोवृध्द नागरिकांना मोतीबिंदू खराब झाल्याचे निष्पन्न झाले.

त्यांच्यावर योग्य उपचार व्हावं त्यांना परत दृष्टी मिळावी या उदात्त हेतूने माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम व त्यांची अर्धांगिनी डॉ.मिताली आत्राम यांनी स्वखर्चातून निस्वार्थ भावनेतून नागपूर येथे पाठवून टोटल रॅटीना केअर येथे दोन दिवसात लेजर मशीन द्वारे शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी मिळवून दिली.आयुष्यभर काबाड-कष्ट करून थकलेल्या या १७ जणांच्या आयुष्याच्या नेत्रविकाराने झडप घातली. आर्थिक परिस्थितीअभावी त्यांना डोळ्यावर वेळीच उपचार करता आले नाहीत. त्यामुळे यातील दोघांनी पूर्ण दृष्टी गमावली होती. तत्काळ शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नव्हता.डॉ. ध्रुबोज्योती साहा, डॉ.स्नेहा अग्रवाल तज्ञ डॉक्टरांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या दोघांसमोरील अंधार दूर केला.

अहेरी उपविभागात असे अनेक रुग्ण आढळले असून पहिल्या टप्प्यात केवळ १७ जणांना नागपूर पाठवून शस्त्रकीया करण्यात आले.पुढेही टप्प्याटप्प्याने अश्या नेत्रविकार असलेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहे.नुकतेच ज्यांच्या वर अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली ती वयोवृद्ध मंडळी नागपूर जाण्यासाठी घाबरत होते.मात्र,अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकार दूर केल्याने त्यांच्या मनातील भीती देखील दूर झाली आणि त्यांना परत जग पाहण्यासाठी दृष्टी मिळाली आहे.

*त्यांनी मंत्री आत्राम यांची भेट घेऊन मानले आभार*

अहेरी येथे नेत्र तपासणी शिबीर घेऊन ज्यांना शस्त्रक्रियेची गरज होती अश्या नेत्रविकार असलेल्या रुग्णांना नागपूर पाठवून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून परत दृष्टी मिळवून दिल्याने त्या १७ जणांनी अहेरी येथील राजवाड्यात येऊन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची भेट घेऊन आभार मानले.