Home Breaking News Chandrapur dist News •शासकीय कर्मचाऱ्यांनी येत्या 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचे...

Chandrapur dist News •शासकीय कर्मचाऱ्यांनी येत्या 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचे निवेदन दिले राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ! • प्रलंबित मागण्यांसाठी होतोय राज्य कर्मचा-यांचा संप !

98

Chandrapur dist News
•शासकीय कर्मचाऱ्यांनी येत्या 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचे निवेदन दिले राज्याच्या मुख्यमंत्र्यांना !
• प्रलंबित मागण्यांसाठी होतोय राज्य कर्मचा-यांचा संप !

चंद्रपूर :किरण घाटे

प्रलंबित मागण्यांसाठी माहे मार्च 2023 व डिसेंबर 2023 ला बेमुदत संप झाले त्याअनुषंगाने दि. १४ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर मुक्कामी विधानसभा अधिवेशनात राज्याच्या मुख्यमंत्र्याना जुना पेन्शन ज्या सुधारित स्वरुपात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा ढाचा निवेदनाव्दारे विधानसभेच्या पटलावर ठेवला. त्यानुसार तत्संबंधातील अधिसूचना/शासन निर्णय पारित करण्याची कार्यवाही होणे अपेक्षित होते. परंतु त्याबाबत शासनाने कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही. सदरची कार्यवाही सत्वर व्हावी यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा शाखा चंद्रपूर च्या वतीने शुक्रवार, दि.19 ऑगस्ट 2024 ला दुपारी 2.00 वाजता राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांचे मार्फत दि. 29 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत संपाबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.

सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन धोरण दि. १ मार्च २०२४ च्या प्रभावाने लागू केल्यासंदर्भांतील अधिसूचना/शासन निर्णय पारित न करणे व जिल्हा परिषद/शिक्षक यांचे बाबतीत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न होणे तसेच प्रलंबित इतर मागण्यांचा देखील शासनास विसर पडलेला आहे. सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी विधानसभा निवडणुकांचा आचारसंहिता कालावधी सुरु होण्यापूर्वी होणे अनिवार्य आहे. दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची जाहिरात/अधिसूचनांव्दारे नियुक्त झालेल्या जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचेबाबत अद्याप अंमलबजावणी संदर्भात संदिग्धता दिसून येते. ही बाब सर्वस्वी अनाकलनीय आहे. त्या अनुषंगाने शासकीय कर्मचारी यांनी आपला असंतोष व्यक्त करण्यासाठी दि. 29 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत संपाबाबतचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांना जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे मार्फत निवेदन सादर करण्यात आले.

या प्रसंगी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर, सरचिटणीस राजु धांडे, प्रकाश राऊत, प्रितम शुक्ला, नितीन पाटील, अजय मेकलवार, शैलेश धात्रक, सीमा पॉल, प्रवीण अदेंकीवार, अनुप भोयर आदी संघटनेचे पदाधिकारी व शासकीय कर्मचारी उपस्थित होते.