Home Breaking News Chandrapur city News • विश्वासाच्या माध्यमातूनच समाजाचा विकास घडवून आणला पाहिजे- कृष्णाजी...

Chandrapur city News • विश्वासाच्या माध्यमातूनच समाजाचा विकास घडवून आणला पाहिजे- कृष्णाजी यादव

84

Chandrapur city News
• विश्वासाच्या माध्यमातूनच समाजाचा विकास घडवून आणला पाहिजे- कृष्णाजी यादव

चंद्रपूर :किरण घाटे

समाज बांधवांनी समाजा करीता अहोरात्र झटले पाहिजे.निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करायला हवी .विश्वासाच्या माध्यमातून समाजाचा विकास घडवून आणला पाहिजे असे मत समाज भुषण पुरस्कार प्राप्त ठरलेले नागपूरचे कृष्णाजी यादव यांनी काल व्यक्त केले.ते चंद्रपूर जिल्हा गोल्ला -गोलकर समाज संघटनाच्या वतीने आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुरस्कार व सत्कार समारंभात बोलत होते.

समाजा तर्फे समाज भुषण पुरस्कार वितरण सोहळा दि. १८ आॕगष्टला दुपारी १ वाजता पंचतेली हनुमान मंदिर सभागृह जटपुरा वार्ड चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोल्ला गोलकर यादव समाजाच्या वतीने कृष्णाजी यादव यांना समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्यातील सर्व समाज बांधव एकत्र येऊन त्यामध्ये वैचारिक देवाणघेवाण तसेच ऋणानुबंध निर्माण व्हावेत याकरिता दरवर्षी प्रमाणे यंदाही गोल्ला गोलकर यादव समाज संघटना जिल्हा चंद्रपूर तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घघाटन बल्हारपूर नगरीचे सहा.पोलीस निरीक्षक दिपक क्रांक्रेडवार यांचे हस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गडचिरोलीचे जेष्ठ समाजसेवक
मनोहर बोदलवार यांनी विभुषित केले होते. तर याच समारंभाला

प्रमुख अतिथी म्हणून मूलचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार पुरुषोत्तम कोमलवार,, प्राचार्य गंगाराम नर्मलवार, हिंगणघाटचे येवतीकर ,व्यंकटेश बंड्रेवार प्रामुख्याने उपस्थित होते.

या शिवाय प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूरचे सहा.आयुक्त मत्स्यव्यवसाय शुभम कोमरेवार प्राध्यापक डॉ.महेंद्र वर्धलवार ,व संतोष बोलुवार कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्ण आणि महाकाली माता यांच्या प्रतिमेला मालार्पण तथा दिप प्रज्वलन करून करण्यात आली

विद्यार्थ्यांनी व्यवसायाभिमुख शिक्षण घ्यावे.शिक्षणात जिद्द, चिकाटी अंगी बाळगले पाहिजे.शिक्षणाची अनेक दालने खुली आहेत.निश्चित असे ध्येय असले पाहिजे.असे मत शुभम कोमरेवार यांनी व्यक्त केले

गुणवंतांचा सत्कार करणे म्हणजे त्यांना पुढील शिक्षणासाठी नवीन ऊर्जा निर्माण करणे होय. आपला सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान आहे.विद्यार्थांमध्ये जिज्ञासा वृत्ती असली पाहिजे.समाजातील गुणवंत विद्यार्थी यांच्यावर ख-या अर्थाने समाजाचं मान सन्मान अवलंबून आहे.असे विचार डाॅ. महेन्द्र वर्धलवार यांनी आपल्या भाषणातून मांडले .तर विद्यार्थ्यांनी आपल्या मध्ये क्षमता,प्रतिभा,आवड, जिद्द आणि चिकाटी निर्माण केली पाहिजे.वेळोवेळी आत्मपरीक्षण केले पाहिजे. यशाचे ऊंच शिखर गाठले पाहिजे असे प्रा.संतोष बोलुवार आपल्या भाषणात म्हणाले.

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी निवडी कडे विशेष लक्ष द्यावे.पालकांनी सुध्दा आवडीच्या क्षेत्रात त्यांना प्रोत्साहित करावे.आपल्या अपेक्षांचे ओझे त्यांचेवर लादु नये.समाजाच्या प्रगती करीता शिक्षणाशिवाय पर्याय नाही असं स्पष्ट मत दिपक क्रांक्रेडवार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. पालकांनी आपल्या मुलांकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.त्यांना प्रोत्साहित करावे.सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. असे प्रतिपादन मनोहर बोदूलवार यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण जिल्हाध्यक्ष अजय मॕकलवार यांनी केले त्यांनी कार्यक्रम आयोजन करण्याचे महत्त्व विषद करीत समाजाने आज पर्यंत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला.सदरहु कार्यक्रमाचे संचालन प्रा.शंकर मद्देलवार आणि प्राचार्य मनोहर कोपुलवार यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मॅकलवार यांनी मानले.

उपरोक्त कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश मॕकलवार, किरण चेनमेनवार,श्यामराज भंडारी,
प्रविण भिमणवार, कृष्णाजी दाऊवार,विजय दंडीकवार, विवेक गुडलावार, तसेच कार्य कारणीतील महिला सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.