Home Breaking News Korpna taluka News •बहुजन समाज पार्टी राजुरा विधानसभा तर्फे तहसीलदारांना निवेदन

Korpna taluka News •बहुजन समाज पार्टी राजुरा विधानसभा तर्फे तहसीलदारांना निवेदन

48

Korpna taluka News
•बहुजन समाज पार्टी राजुरा विधानसभा तर्फे तहसीलदारांना निवेदन

सुवर्ण भारत :मनोज गोरे

कोरपना : बहुजन समाज पार्टी राजुरा विधानसभा तर्फे कोरपणा येथे भास्कर राव कामटकर यांच्या नेतृत्वात अनुसूचित जाती, जमातीचे वर्गीकरण व त्यांना क्रीमिलेयर लावण्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला 1 ऑगस्ट 2024 रोजी चा संविधान विरोधी निर्णय रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविणे व आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकने याविषयी निवेदन देण्यात आले.

अनूसूचित जातींचे वर्गीकरण व अनुसूचित जाती जमातीना क्रिमीलेअर न लावणे बाबत संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायलायाचा निर्णय रद्द करणे.

न्यायधिशांच्या नियुक्ती साठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायायधिशाची नियुक्ती ऑल इंडिया जुडेशरी सर्व्हिस चे गठन करून यात आरक्षण लागू करावे.

एससी, एसटी,ओबीसी, भटक्याचे आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्युल 9 मध्ये त्याचा अंतरभाव करावा. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी नुसार जातीनिहाय जनगणना करावी.

सर्वाना समान न्याय या तत्वानुसार ओपन कॅटगरीचे सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रिमीलेअर लावावे., खाजगी संस्था -private sector मध्ये आरक्षण लागू करावे. जातीचे निर्मूलन करण्यासाठी TC वर जात लिहिणे बंद करावे व जातींचे दाखले देणे बंद करून फक्त प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे. अनुसूचित जाती, जमाती व मागास वर्गीयांचा रिक्त असलेल्या पदांचा अनुशेष भरण्यासाठी आरक्षित व खुल्या प्रवर्गातील जागांच्या स्थितीचे श्वेतपत्र जाहीर करावे.या मागण्यासाठी निवेदन देण्यात आले .

यावेळी राजुरा विधानसभेचे अध्यक्ष संदीप आदे, प्रभारी पांडुरंग तुमराम,महासचिव सदाशिव मडावी, सचिव रमेश घुमे, देवराव गेडाम, हरिदास गौरकार, जंगाजी सोयाम ,दिनेश पडवेकर जिवलग उमरे,अंकुश मडावी,राजू बुरेवार,दिलीप सिडाम,अमोल गोरे , सिद्धार्थ खैरे, महादेव मडावी, संतोष मडावी, रामकिसन मडावी, विजयराव खाडे , चेतन पडवेकर या बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.