Home Breaking News Gadchiroli dist News •राखी बांधून बघिनींनी दिलेला आशीर्वाद मोलाचा:मंत्री धर्मराव बाबा आत्राम...

Gadchiroli dist News •राखी बांधून बघिनींनी दिलेला आशीर्वाद मोलाचा:मंत्री धर्मराव बाबा आत्राम • रक्षा बंधन कार्यक्रमाला उसळली लाडक्या बघिनींची गर्दी • दुर्गम भागातील बघिनिंनी राखी बांधून दिल्या शुभेच्छा

20

Gadchiroli dist News
राखी बांधून बघिनींनी दिलेला आशीर्वाद मोलाचा:मंत्री धर्मराव बाबा आत्राम

• रक्षा बंधन कार्यक्रमाला उसळली लाडक्या बघिनींची गर्दी
• दुर्गम भागातील बघिनिंनी राखी बांधून दिल्या शुभेच्छा

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

एटापल्ली: अतिदुर्गम व आदिवासी बहुल परिसरातील शेकडो-बघीनींनी राखी बांधून मला दिलेला आशीर्वाद हा मोलाचा असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त हेडरी येथे भव्य रक्षा बंधन कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी परिसरातील शेकडो महिलांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांना राखी बांधून दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिले.यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमात माजी पंचायत समिती सदस्य हर्षावर्धन बाबा आत्राम, माजी जि प सदस्य संजय चरडुके,माजी जि प सदस्य रामजी कत्तीवार, पुरसलगोंदीचे सरपंच अरुणा सडमेक,चंदू दोरपेटी, कमलापूरचे माजी सरपंच सांबय्या करपेत,मांतय्या आत्राम,संभाजी हिचामी, पापा पुण्यमुर्तीवार,कवडो पाटील,लक्ष्मण नरोटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती जनार्दन नल्लावार,पांडू कोलामी,सुगंधा उराडे,कैलास कोरेत,बाळू राजकोंडावार,नगरसेवक रमेश टिकले तसेच परिसरातील विविध गावातील कार्यकर्ते व इतरही बंधू-बघिणी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी रक्षाबंधन निमित्ताने हेडरी सारख्या ती दुर्गम भागात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात परिसरातील शेकडो- भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला दिलेला आशीर्वाद जन्मोजन्मी मी विसरणार नाही असे म्हटले.एवढेच नव्हे तर माझ्या लाडक्या बहिणींच्या उज्वल भविष्यासाठी दिवसरात्र एक करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

दरम्यान हेडरी गावात मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे आगमन होताच आदिवासी पारंपारिक नृत्य आणि त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.आयोजित कार्यक्रमात रक्षाबंधनानंतर मंत्र्यांच्या हस्ते लाडक्या भगिनींना साडीचोळी व भेटवस्तू स्वरूपात ओवाळणी देण्यात आली.आलेल्या लाडक्या बहिणींसाठी कार्यकर्त्यांकडून जेवणाची उत्तम सोय करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास कोरेत यांनी केले.

*पारंपारिक रेला नृत्यात मंत्र्यांनी धरला ठेका*

एटापल्ली तालुक्यातील हेडरी गावात आयोजित रक्षाबंध न कार्यक्रमानिमित्त राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम गेले असता परिसरातील आदिवासी बंधू बघीनींनी त्यांच्या स्वागतासाठी रेला नृत्त्यासह इतर नृत्य सादर केले.यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी देखील रेला नृत्यामध्ये ठेका धरला आणि उपस्थितामध्ये उत्साह निर्माण केला.