Home Breaking News Rajura Taluka News • राजुरा विधानसभा निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून उतरणार प्रकाश...

Rajura Taluka News • राजुरा विधानसभा निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून उतरणार प्रकाश बोरकर

484

Rajura Taluka News
• राजुरा विधानसभा निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून उतरणार प्रकाश बोरकर

सुवर्ण भारत : मनोज गोरे
प्रतिनीधी, चंद्रपूर

कोरपणा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अनेक वर्षांपासून राजुरा विधानसभेत अविरत कार्य करत होते अनेकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले .राजुरा विधानसभेची उमेदवारी ही सर्वसाधारण असून एका सच्चा निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षाने उमेदवारी न दिल्याने प्रकाश बोरकर यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केलीत .

जिवती ,कोरपणा, गोंडपिपरी ,राजुरा या तालुक्यात प्रकाश बोरकर यांचा बऱ्याच प्रमाणात प्रस्त असल्याने उमेदवारी मिळावे यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. मात्र पक्षाने त्याची उमेदवारी घोषित न करता विधानसभा बाहेरील उमेदवारांना राजुरा विधानसभेची उमेदवारी दिली जात असल्याचे संकेत आहे.तेव्हा ही निवडणूक मी अपक्ष लढविणार असल्याचे मत प्रकाश बोरकर यांनी व्यक्त केले.

           महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अनेक आंदोलने सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे प्रकाश बोरकर 2024 च्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढविणार असल्याचे बोलल्या जाते.चारही तालुक्यात प्रचार सुरू असून पक्षाने तिकीट नाकारली असली तरी आपण मात्र अपक्ष निवडणूक लढविणार असून सामान्य जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असे बोरकर यांनी म्हटले आहे.