Home Breaking News Chandrapur city news • जागृतीचा अग्नी तेवत ठेवा- ऍड. योगिता रायपूरे

Chandrapur city news • जागृतीचा अग्नी तेवत ठेवा- ऍड. योगिता रायपूरे

45

Chandrapur city news

• जागृतीचा अग्नी तेवत ठेवा- ऍड. योगिता रायपूरे

सुवर्ण भारत: शंकर महाकाली

चंद्रपूर: जागृतीचा अग्नी कायम ठेवण्याचे काम कवी,साहित्यिक विचारवंतांनी सातत्य पूर्ण जोपासले आहे.’संविधान हटाव’ च्या बाता करण्याऱ्यांवर कठोर कार्यवाही व्हायला पाहिजे.संविधानातील मानवी मूल्य जोपसण्याचे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे.”आपल्या हातात जी पेन आहे,संविधानाची देण आहे” असे परखड मत पुरोगामी साहित्य संसदेच्या विदर्भ अध्यक्षा ऍड. योगिता रायपूरे यांनी मांडले. दीप प्रज्वलन तथा संविधानाची उद्देशिका वाचून कार्यक्रमाचे उदघाट्न झाल्याचे त्यांनी जाहीर केले.पुरोगामी साहित्य संसद च्या “जागर संविधानाचा,विचार मानवी मूल्यांचा” अंतर्गत कवी संमेलनाच्या उदघाटक म्हणून बोलत होत्या.
दिनांक १९ ऑक्टोम्बर २०२४ रोजी स्थानिक मृणालिनी सभागृहात आयोजित पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य अस्मिता दारुंडे हिंगणघाट या कार्यक्रमाध्यक्ष म्हणून लाभल्या होत्या.पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य सचिव निलेश ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम थाटात संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रस्थाविक संसदेचे जिल्हाध्यक्ष विजय भासारकर यांनी केले.
कवी संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध कथाकार,भाष्यकार, समीक्षक हर्षवर्धन डांगे यांनी भूषवले तर रसपाल शेंद्रे हिंगणघाट यांनी भारदस्त सूत्र संचालन केले.कविसमेलनात गझलकार दिलीप पाटील,विजय भसारकर,अरुण लोखंडे,शाहिदा शेख,प्रणित झाडे,मनीषा वांढरे,प्रीती वेलेकर,ऍड योगिता रायपूरे, संगीता घोडेस्वार,ज्योती चन्ने,सरिता बिंकलवार,नरेंद्र सोनारकर,विशाल डुंबेरे,छकुली कोटांगडे इत्यादी कवींनी आपल्या हिंदी मराठीतून कविता सादर केल्या.या प्रसंगी सातत्यपूर्ण समाजिक उपक्रम राबविणाऱ्या बल्लारपूर युथ या समाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नरेंद्र सोनारकर यांनी केले.