Home Breaking News Chandrapur city news • अम्मा काळाच्या पडद्याआड! • चंद्रपूरचे आ.किशोर जोरगेवार...

Chandrapur city news • अम्मा काळाच्या पडद्याआड! • चंद्रपूरचे आ.किशोर जोरगेवार यांच्या मातोश्रीचे वयाच्या 80 व्या वर्षी दुःखद निधन •उद्या सोमवारी सकाळी 9 वाजता होणार अंत्यविधी

77

Chandrapur city news
• अम्मा काळाच्या पडद्याआड!

• चंद्रपूरचे आ.किशोर जोरगेवार यांच्या मातोश्रीचे वयाच्या 80 व्या वर्षी दुःखद निधन
•उद्या सोमवारी सकाळी 9 वाजता होणार अंत्यविधी

सुवर्णभारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर:चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांचे आज आजाराने निधन झाले.
चंद्रपूर येथील राजमाता निवासस्थानी सकाळी 9.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सोमवारी सकाळी 9 वाजता गांधी चौक येथील कोतवाली वार्ड येथील राजमाता निवासस्थानावरुन त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
बिनबा गेट येथील शांतीधाम येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे जोरगेवार कुटुंबियांकडून कळविण्यात आले आहे.
अम्माचे अमोल कार्य !
अम्मांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना विविध संस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या नावाने चंद्रपूरात सुरु असलेल्या “अम्मा का टिफिन” आणि “अम्मा कि दुकान” या उपक्रमामुळे अनेकांना हक्काची साथ मिळाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने उपचारासाठी त्यांना नागपूर येथे दाखल करण्यात आले होते.
जवळपास 10 दिवस नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने काल शनिवारीच त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. घरी डॉक्टरांच्या निगराणीत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाला आणि सकाळी 9.30 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.