Home Breaking News • गणेश जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत व...

• गणेश जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत व शीतपेयाचे वाटप.

148

• गणेश जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत व शीतपेयाचे वाटप.

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर : गणेश जयंती निमित्त नव बाल साईनाथ गणेश मंडळ च्या वतीने काडण्यात आलेल्या शोभायात्रेचे भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभेच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयासमोर स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी गणेश भक्तांना शितपेयाचे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेश जयंती निमित्त नव बाल साईनाथ गणेश मंडळच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल मंदिर येथील गणपती मंदिर येथून निघालेली ही शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गाने होते. जटपूरा गेटला वळसा घालून पून्हा गणेश मंदिर येथे दाखल झाली. त्यांनतर गणपती मंदिराला वळसा घालुन शोभायात्रेचा समारोप करण्यात आले. तत्पूर्वी शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालया समोर शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना शितपेयाचे वाटप करण्यात आले. या शोभायात्रेत गणेश भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.