Home Breaking News Bhadravti taluka news • ग्रामपंचायतीकडून तुम्हाला कोणते महत्त्वाचे दाखले मिळतात? किती लागतात...

Bhadravti taluka news • ग्रामपंचायतीकडून तुम्हाला कोणते महत्त्वाचे दाखले मिळतात? किती लागतात त्यासाठी पैसे? जाणून घ्या..!

42

Bhadravti taluka news
• ग्रामपंचायतीकडून तुम्हाला कोणते महत्त्वाचे दाखले मिळतात? किती लागतात त्यासाठी पैसे? जाणून घ्या..!

सुवर्ण भारत:राजेश येसेकर
भद्रावती तालुका प्रतिनिधी

भद्रावती : गावाचा एक नागरिक म्हणून तुम्हाला अनेक प्रकारची कागदपत्रे म्हणजेच दाखले देण्याची महत्त्वाची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते. यामध्ये अनेक प्रकारचे दाखले असतात जे आपल्याला ग्रामपंचायतीमधून प्राप्त होतात.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ च्या कलम तीन प्रमाणे जर पाहिले तर ग्रामपंचायत मार्फत नागरिकांना विविध प्रकारच्या दाखले किंवा सेवा दिल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने….

1. तुम्हाला जर जन्म नोंद दाखला हवा असेल तर तो ग्रामपंचायतीमधून मिळतो व त्याकरिता वीस रुपये शुल्क तुम्हाला द्यावे लागते.
2. तुम्हाला जर मृत्यू नोंद दाखला हवा असेल तर तो देखील तुम्हाला ग्रामपंचायतीच्या मार्फत मिळतो व त्याकरिता वीस रुपये शुल्क लागते.
3. विवाह नोंद प्रमाणपत्र हवे असेल तर ते देखील तुम्हाला ग्रामपंचायतीमार्फत मिळते व त्याकरिता वीस रुपये शुल्क द्यावे लागते.
4. रहिवाशी दाखला हवा असेल तर तो तुम्हाला ग्रामपंचायतीमार्फत मिळतो व त्याकरिता वीस रुपये शुल्क लागते.
5. तुम्हाला जर दारिद्र्य रेषेखालील दाखला हवा असेल तर तो देखील तुम्हाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळतो व त्याकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारचे शुल्क म्हणजेच पैसे द्यावे लागत नाही.
6. तुम्हाला जर हयात असल्याचा दाखला हवा असेल तर तो देखील तुम्हाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळतो व त्याकरिता कुठल्याही प्रकारचे शुल्क तुम्हाला द्यायला लागत नाही.
7. तुम्हाला जर ग्रामपंचायत येणे बाकी दाखला हवा असेल तर तो तुम्हाला ग्रामपंचायतीमधून मिळतो व त्याकरता तुम्हाला वीस रुपये शुल्क लागते.
8. शौचालयाचा दाखला तुम्हाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळतो व त्याकरिता देखील तुम्हाला वीस रुपये शुल्क लागते.
9. तुम्हाला जर नमुना नंबर आठ उतारा हवा असेल तर तो तुम्हाला ग्रामपंचायत देत असते व त्यासाठी वीस रुपये शुल्क द्यावे लागते.
10. तुम्हाला जर निराधार असल्याचा दाखला हवा असेल तर तो देखील तुम्हाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळतो व तो मिळवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज म्हणजेच पैसे द्यावे लागत नाही.
11. विधवा असल्याचा दाखला हवा असेल तर तो तुम्हाला ग्रामपंचायत देत असते व त्याकरता वीस रुपये शुल्क आकारते.
12. परीतेक्ता असल्याचा दाखला हवा असेल तर तो देखील तुम्हाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळतो व त्याकरिता तुम्हाला वीस रुपये शुल्क आकारले जाते.
13. विभक्त कुटुंबाचा दाखला देखील ग्रामपंचायत देते व त्याकरता वीस रुपये शुल्क तुम्हाला द्यायला लागते.

यासंबंधी शासनाचा एक नियम असा आहे की ग्रामपंचायतींना दाखल्यांसाठी जे काही शुल्क आकारत असते त्यासंबंधीचा फलक ग्रामपंचायतीच्या दर्शनी म्हणजे समोरच्या भागात लावणे आवश्यक आहे.