Home Breaking News Varora taluka news • वरोरा तालुक्यात एल सी बी ची मोठी कारवाई...

Varora taluka news • वरोरा तालुक्यात एल सी बी ची मोठी कारवाई • आरोपीचे घरून 2,55,160 रु चा मुद्देमाल केला जप्त • चिनोरा येथील कारवाई

89

Varora taluka news
• वरोरा तालुक्यात एल सी बी ची मोठी कारवाई

• आरोपीचे घरून 2,55,160 रु चा मुद्देमाल केला जप्त

• चिनोरा येथील कारवाई

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : गोपनीय माहितीवरून पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा चिनोरा येथील आरोपी अनिलसिंग अदबसिंग जुनी वय 30 वर्ष, रा. चिनोरा, ता. वरोरा, जी. चंद्रपूर यांचे घरी जाऊन घरझडती घेतली असता 2,55,160 रु चा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी कारवाई करीत मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये 54 पेट्या देशी दारू -किंमत 1,89,000, विदेशी दारूच्या 8 पेट्या किंमत 66,460 रु, अशा एकूण 62 पेट्या देशी -विदेशी दारूचा एकूण 2,55,160 रु चा मुद्देमाल मिळून आला. पो स्टे वरोरा येथे अपघात क्र. 759/2024 कलम 65(ई )अन्वये गुन्हा दाखल करून सदर मुद्देमाल मोहरर च्या ताब्यात देण्यात आला. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व सहा. पोलीस अधीक्षक जनबंधू मॅडम, तसेच एल. सी. बी चे कोंडावर यांचे मार्गदर्शनाखाली पो. उपनि विनोद भुरले स. फौ. स्वामीदास चालेकार, धनराज करकाडे, पो. ह. नितीन कुरेकर, अजय बागेसर, पो. अ. शशांक बदामवर सर्व स्थानिक गुन्हा शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.

तालुक्यात देशी -विदेशी दारू दुकानें भरपूर वाढली असून परवानाधारक दुकानदारांनी गावागावात दारू विक्री करणारे दलाल निर्माण केले आहे. या दलालांना दारू पुरविण्यासाठी एजेंटमार्फत गावात दारू पोहचली जातात. तसेच शहरात सुद्धा प्रत्येक वॉर्डात अवैध्यपने दारू विक्री केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. निवडणुकीच्या धामधूमीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या नाही तर गावातील सामाजिक व्यवस्था बिघडणार आहे. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी कारवाईचे योग्य पाऊल उचलून निवडणुकीचे पूर्वी वरोरा तालुक्यात मोठी कारवाई केली असून अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणानले आहे.