ना .विजय वडेट्टीवारचा मूल शहराच्या विकास कामाच्या प्रेमात!
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
चंद्रपूर:शिर्षक वाचून आश्चर्य वाटेल, पण परिस्थिती तशीच दिसते. ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे, राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे मूलच्या झालेल्या विकासाच्या प्रेमात आहेत काय? असा प्रश्न सामान्य नागरीकांना पडले तर नवल नाही.
मूल शहरात आकापूर येथे एमआयडी आहे. या एमआयडीसीत काही मध्यम उद्योग सुरू आहेत. नव्यानेच आणखी काही उद्योग येण्याच्या मार्गावर असून, येथे मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. मूल सोबत चंद्रपूर जिल्हयात सिंदेवाहीसह अनेक एमआयडी मंजूर झाले. मात्र मूल एमआयडीसीत पाणी, रस्ते, वीज अशा पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाल्यांने, या एमआयडीसीत आता जागाही उरली नाही. याच विकसीत एमआयडीसीची भुरळ विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना पडली आणि त्यांचे कुटूंबियाशी संबधीत इथेनाल निर्मीतीचा मोठा प्रकल्प मूल एमआयडीसीत आकाराला येत आहे.
सिंदेवाहीची एमआयडीसी धुळखात आहेत, सावली, ब्रम्हपुरी तालुक्यात एमआयडीसी नाही. उद्योगविहीन तालुके आहेत. मागील दहा वर्षापासून ना. वडेट्टीवार यांनी या भागात एमआयडीसी आणू शकले नाही. त्यांचे मतदार संघात कुठलीही पायाभूत सुविधा उपलब्ध नाही त्यामुळेच ना. विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवाणी वडेट्टीवार व देवयानी विजय वडेट्टीवार या संचालीका असलेल्या CARNIVAL INDUSTRIES PRIVATE LIMITED या कंपनीचा इथेनाल प्रकल्प मूलच्या एमआयडीसीत धडाक्यात सुरू आहे. मूल येथील एमआयडीसी विकसीत असल्यांने, त्यांनी घेतलेला निर्णय कंपनी म्हणून योग्यच आहे. मूल शहराकरीता ही अभिमानाची बाब आहे सोबतच, मूलच्या विकासावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार खूष आहेत असे तर नाही ना?