• भद्रावती नाभिक समाजाचा कोणत्याही विशिष्ट उमेदवाराला पाठिंबा नाही
• आपल्या मनपसंत कोणत्याही उमेदवाराला मतदान करा
• नाभिक समाजातील विविध संघटनांचे आवाहन
सुवर्ण भारत : राजेश येसेकर
भद्रावती तालुका प्रतिनिधी
भद्रावती : नाभिक समाजाचा कोणत्याही विशिष्ट उमेदवाराला पाठिंबा नाही. आपल्या आवडीप्रमाणे मनपसंत कोणत्याही उमेदवाराला मतदान करा. अशा आशयाचे जाहीर पत्रक भद्रावती येथील नाभिक समाजाच्या विविध संघटना व समाजबांधवांच्या वतीने प्रकाशित करण्यात आले. यात नाभिक सलून दुकानदार असोसिएशन भद्रावती ,संत श्री नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समिती भद्रावती तथा भद्रावती नाभिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात आलेल्या निवेदनातून समाज बांधवांना आवाहन करताना लिहिण्यात आले की, “येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भद्रावती येथील नाभिक समाजाने एका विशिष्ट उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे पत्र सोशल मीडियावर प्रसारित झाले आहे. 14 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता झालेल्या सभेत हा पाठिंबा जाहीर झाल्याची चर्चा आहे. परंतु या पाठिंब्याशी नाभिक समाजातील नाभिक सलून दुकानदार असोसिएशन भद्रावती, संत श्री नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समिती, आणि भद्रावती नाभिक संघटना या संघटनांचा किंवा शहरातील नाभिक समाज बंधू भगिनींचा कोणताही संबंध नाही. सदर पाठिंबा हा नाभिक समाजाचा अधिकृत पाठिंबा नसून काही व्यक्तींनी केलेले वैयक्तिक विधान आहे. नाभिक समाज हा कष्टकरी व प्रामाणिक समाज असून समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांशी आणि उमेदवारांशी त्यांचे आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कोणत्याही एका विशिष्ट उमेदवाराला पाठिंबा देणे हा नाभिक समाजाचा नियम नाही. लोकशाही प्रणालीवर नितांत श्रद्धा असलेला नाभिक समाज कोणत्याही विशिष्ट पक्ष किंवा उमेदवाराच्या दावणीला बांधला जाणारा नाही. समाजात सर्वांना घेऊन सोबत चालण्याचा संस्कार या समाजावर आहे. वरील संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या तथाकथित पाठिंब्याबाबत कोणतीही माहिती किंवा सहमती नव्हती. तरी भद्रावती तालुक्यातील नाभिक समाज बांधवांना विनंती करण्यात येते की, या निवडणुकीत नाभिक समाजाने कोणत्याही विशिष्ठ पक्ष किंवा उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. समाज बांधवांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या आवडीप्रमाणे आणि विवेकबुद्धीने आपल्या मनपसंत उमेदवाराला मतदान करावे” असे आवाहन केले. यावेळी
नाभिक समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.त्यात
नाभिक सलून दुकानदार असोसिएशन भद्रावती, संत श्री. नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समिती भद्रावतीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.त्यात सर्वश्री अध्यक्ष – पांडुरंग विठ्ठल हनुमंते, उपाध्यक्ष – बंडू मधुकर लांडगे,सचिव – बंडू व्ही. लांडगे, सचिव – सचिन प्रभाकर नक्षिणे सहसचिव -सागर ज्ञानेश्वर घुमे, कार्याध्यक्ष- हरीश शेखर घुमे, ज्येष्ठ समाजसेवक मुर्लीधर काशीरामजी मेश्राम, सदस्यगण सर्वश्री पियुष ज्ञानेश्वर घुमे, प्रमोद क्षीरसागर, प्रफुल्ल देवराव हनुमंते, सुधीर रामभाऊ लांडगे, वामन च. सुरकर, निलेश देवईकर, सतीश नारायण मांडवकर, हनुमान वसंता नक्षिणे, राजेश बापूराव येसेकर यांचेसह अनेक नाभिक बांधव उपस्थित होते.