Home Breaking News • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा पाईक म्हणून साथ द्यावी • सुधीर मुनगंटीवार...

• राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा पाईक म्हणून साथ द्यावी • सुधीर मुनगंटीवार यांचे अ भा गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांना आवाहन

10

• राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा पाईक म्हणून साथ द्यावी
• सुधीर मुनगंटीवार यांचे अ भा गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांना आवाहन

श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव नागपूर विद्यापीठाला देण्यासंदर्भात मी केलेल्या संसदीय संघर्षाला गुरुदेव भक्तांच्या प्रेमाचे बळ मिळाले व हा संघर्ष यशस्वी झाला. तेव्हा पासून निर्माण झालेले हे प्रेमाचे नाते आज अधिक दृढ झाले हे.राष्ट्रसंतांच्या विचारांचा पाईक म्हणून, त्यांचा शिष्य म्हणून या निवडणुकीत मला साथ द्यावी असे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सुधीर मुनगंटीवार यांनी आज संवाद साधला. त्या दरम्यान ते बोलत होते. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव मिळावे यासाठी मी विधानसभेत सा-या संसदीय आयुधांचा उपयोग केला. जेव्हा याबाबतचा निर्णय झाला तेव्‍हा गुरुकुंज मोझरीमध्‍ये मला निमंत्रण देण्‍यात आले आणि मोझरीमध्‍ये दिवाळी साजरी केली. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज ज्‍या गादीवर बसायचे त्‍या गादीवर पंडीत नेहरू बसले, डॉ. राजेंद्रप्रसाद बसले. त्‍या गादीवर मला बसवून जो माझा सन्‍मान मोझरी मध्‍ये करण्‍यात आला तो मी आयुष्‍यभर विसरू शकणार नाही. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचे इतर भाषांमध्ये भाषांतरही करण्‍याचेही काम माझ्या हातुन झाले. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता ही आमच्‍या गावांच्‍या संपन्‍नतेसाठी एक शब्‍द नव्‍हे तर हे पुस्‍तक म्‍हणजे एक विद्यापीठ आहे. या विद्यापीठातुन आपण साधारणतः त्‍या गावाच्‍या संपूर्ण सुख आणि समाधानाचा मार्ग शोधत असतो. ग्रामगीता १० रूपयामध्‍ये उपलब्ध करून देण्‍यामध्‍ये मला यश आले. आज राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेल्‍या अ भा गुरुदेव सेवा मंडळाचा राष्ट्रीय उपाध्‍यक्ष म्‍हणून मी काम करतो आहे. भविष्‍यातही मोझरीच्या विकासासाठी मी प्रयत्‍नशील राहील.या आधीही जेव्‍हा त्या ठिकाणी नॅशनल हायवे मध्‍ये काही गोष्‍टी घडणार होत्‍या तेव्‍हाही मी मोझरी सोबत उभा राहीलो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधत मी योग्‍य ती मदत केली. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांच्‍या नावाने मी अनेक ठिकाणी प्रार्थनास्‍थळे बांधली आहेत. भविष्‍यामध्‍ये विदर्भात एक उत्तम वैचारिक आंदोलन आपण सारे एकत्र येऊन उभारू अशी ग्वाही देताना या निवडणुकीत गुरुदेव भक्तांचे सहकार्य मिळावे अशी विनंती केली.

यावेळी अ भा गुरुदेव सेवा मंडळाचे लक्ष्मणराव गमे, सुभाष कासनगोट्टूवार आदींची उपस्थिती होती.
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयासाठी परिश्रमपूर्वक कार्य करण्याचा निर्धार केला.