• यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रास सदिच्छा भेट
सुवर्ण भारत : राजेश येसेकर
भद्रावती तालुका प्रतिनिधी
भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अभ्यास केंद्रास (4227-A) चंद्रपूर जिल्ह्यातील विविध अभ्यास केंद्रात कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी
कला वाणिज्य महिला महाविद्यालय बल्लारपूर येथील केंद्र संयोजक डॉ. मनीष कायरकर, खत्री महाविद्यालय तुकूम, चंद्रपूर येथील केंद्रप्रमुख तथा प्राचार्य डॉ. जनार्दन काकडे, एफईएस गर्ल्स कॉलेज चंद्रपूर येथील कार्यकारी प्राचार्य डॉ. राजेश चिमणकर यांनी अभ्यास केंद्रास सदिच्छा भेट दिली. पाहुण्यांनी अभ्यास केंद्रावरील कार्यपद्धती बाबत समाधान व्यक्त केले. यावेळी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, विवेकानंद महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी केंद्र संयोजक डॉ. प्रकाश तितरे, केंद्र संयोजक डॉ यशवंत घुमे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्राचार्य उमाटे यांनी उपस्थित पाहुण्यांना महाविद्यालयाचा वार्षिकांक भेट देत सर्वांचे स्वागत केले. सहकेंद्रसंयोजक आशिष दुपारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.