• सन 1948 पासून दत्त जयंती निमित्य महाकाल्याची परंपरा कायम
• महाप्रसादाला झाली 75 वर्ष
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी,वरोरा
वरोरा : भारत देश स्वातंत्र्यपूर्व काळापासून देवदेवताना मानणारा तसेच भारतीय संस्कृती मधला लोकशाही प्रणालीतील सुजलाम देश म्हणून गणल्या जातो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमिमध्ये महाराष्ट्राच्या भूमीत जन्मास आलेले भगवान यांची आपापल्या इच्छेनुसार आणि श्रद्देने पूजतात. काही श्रदाळू जयंती उत्सवाची परंपरा वर्षानुवर्षं सुरु ठेवण्याचा एक इतिहास आहे. वरोऱ्यापासून काही अंतरावर वणी रोडवर स्वातंत्र्यं पूर्व काळापासून गणेशाची मूर्तीची स्थापना केली असून मंदिरात विराजमान झाली आहे. 1948 पासून याच गणेश मंदिरात गेली 75 वर्षांपासून श्री. गुरुदेव दत्त जयंतीचे औचित्य साधून दरवर्षाला महाकाल्याचे आयोजन 15 डिसेंबर 2024 ला करण्यात आले होते.
विनायक, धर्मशील,दत्ता, विजय तडस यांनी आपल्या पूर्वजाची परंपरा कायम ठेवीत हजारो भाविक भक्तांसाठी 15 डिसेंबर ला पूजा, महाकीर्तन आणि दत्त जयंतीचे दिवशी हजारो लोकांसाठी महाप्रसादाचाचे आयोजन कारण्यात आले होते. 1948 पासून सुरु असलेली परंपरा आजतगायात सुरु असून वरोऱ्यातील भाविक मोठ्या उत्सवाने सहभागी होत असतात. या उत्सवात तडस परिवारातील लहान -मोठे सदस्य मदतीच्या कार्याची धुरा सांभाळतात. आदी लोक सुद्धा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहयोग करतात.