Home Breaking News #Bhadravti • निप्पान प्रकल्पग्रस्तांनी घेतली खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची भेट. •...

#Bhadravti • निप्पान प्रकल्पग्रस्तांनी घेतली खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची भेट. • प्रकल्पग्रस्तानी खासदारांसमोर मांडल्या व्यथा.

48
Oplus_16908288

#Bhadravti
• निप्पान प्रकल्पग्रस्तांनी घेतली खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची भेट.

• प्रकल्पग्रस्तानी खासदारांसमोर मांडल्या व्यथा.

सुवर्ण भारत:राजेश येसेकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती

भद्रावती : येथील तहसील कार्यालया समोरील निप्पाण प्रकल्पग्रस्तांच्या धरणे आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी दिनांक सात रोज सोमवारला वरोरा येथील निवासस्थानी जाऊन खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. यावर दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रकल्पग्रस्तांचा हा प्रश्न उचलून त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता.मात्र, सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे यात हितसंबंध गुंतलेले असल्याने याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. लवकरच मी कंपनी, प्रकल्पग्रस्त व जिल्हाधिकारी यांची बैठक लावून या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करेल. असे आश्वासन यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले.

निप्पान साठी संपादित केलेल्या जागेवर ग्रेटा आणि येरा या कंपन्याचे काम सुरू करण्यात आले आहे, मात्र आधी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या शासनाने सोडवाव्यात अशी मागणी प्रकल्पग्रस्तांची आहे. त्यासाठी प्रति एकर दहा लाख रुपये अनुदान,नोकरीची हमी, कंपनी,एमआयडीसी व प्रकल्पग्रस्त यांच्यात त्रिपक्षीय करार करणे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्या प्रकल्पग्रस्तांनी शासनासमोर ठेवलेल्या आहेत. यावेळी बंडू भादेकर, देवराव खापणे, बाबा तराळे, आरिफ शेख, सुरेश बदखल, विलास डोये, प्रभाकर सावनकर, लिमेश माणूसमारे, तेजकरण बदखल, रवी बोडेकर आदी उपस्थित होते.