#Bhadravti
• राम नामाने दुमदुमला गवराळा वॉर्ड आकर्षक रोषणाई, जिवंत देखाव्यांचे प्रमूख आकर्षण.
सुवर्ण भारत राजेश येसेकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : श्री राम जय राम जय जय राम चा गजर करीत श्री रामनवमी उत्सव मोठ्या थाटामाटात व दिमाखदार चित्ररथ जणू काही प्रत्यक्षात प्रभू राम अवतरले अश्या प्रतिकृतीतून सोहळा संपन्न झाला. गणपती वॉर्ड भद्रावती येथील सलगचार वर्षापासून सामाजिक धार्मिक क्रीडा व शैक्षणिक कार्यात आघाडीवर असलेल्या श्री. राम नवमी उत्सव समिती च्या सर्व तरुण उत्साही युवकांच्या व जेष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनात दिनांक ४ एप्रिल पासून सोहळ्यास सुरवात करण्यात आली ४ तारखेला पंकज पाल महाराज यांचे किर्तन ६ तारखेला संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारित चित्रपट, व ६ एप्रिलला भव्य दिव्य श्रीराम शोभायात्रा अश्या भरगच्च कार्यक्रमातूनअतिशय शिस्तबद्ध कायदा व सुव्यवस्थेचे भान राखून रामनवमी साजरी करण्यात आली.
मुखी रामनाम व डिजेच्या तालावर महिला पुरुष युवक, बच्चे कंपनी यांनी या शोभायात्रेत खरी रंगत आणली.कार्यक्रमाच्या शेवटी श्री राम नवमी उत्सव समितीच्या वतीने सर्व वॉर्ड वासियांचे तसेच भद्रावतीच्या ठाणेदार लता वाडिवे यांचे विशेष आभार मानून , व भोजनदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.