# Chandrapur
• प्रख्यात गायिका शहनाज अख्तर यांच्या भक्तिगीतांनी श्रोते झाले मंत्रमुग्ध!

चंद्रपूर :प्रियंका गायकवाड
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा तथा श्री माता महाकाली महोत्सव ट्रस्टच्या वतीने महाकाली मंदिर यात्रा परिसरात आयोजित करण्यात आलेला सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला चंद्रपूरकर भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून भक्तीरसात न्हाल्याचा अनुभव घेतला.
या कार्यक्रमास आमदार जोरगेवार, सत्कारमूर्ती जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल, तहसीलदार विजय पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खेवले, शहर अभियंता विजय बोरीकर, सिटी पोलीस स्टेशनच्या निरीक्षक प्रभावती एकुरके, रामनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आसिफ रजा, वाहतूक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील, वेकोलीचे क्षेत्रीय महाप्रबंधक, विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता व सहाय्यक अभियंता, एस.टी. महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता रविंद्र हजारे, प्रभारी उप-अभियंता आशीष भारती, शहर स्वच्छता निरीक्षक डॉ. अमोल शेळके, नगर रचनाकार राहुल भोयर, सहाय्यक नगर रचनाकार प्रतीक देवतळे, सुरक्षा अधिकारी राहुल पंचबुद्धे, सहाय्यक अभियंता शुभांगी सूर्यवंशी, नगर सचिव नरेंद्र बोबाटे, यांत्रिकी विभाग प्रमुख रविंद्र कळंबे, पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता सोनुजी थुल, विद्युत विभागाच्या उपअभियंता प्रगती भुरे, सिस्टम मॅनेजर अमोल भुते, भांडारपाल सिद्दीकी शेख, झोन क्र. ३ चे सहाय्यक आयुक्त संतोष गर्गेलवार, आणि झोन क्र. १ चे सहाय्यक आयुक्त अक्षय गडलिंग, अतिक्रमण विभागाचे मनिष शुक्ला यांची उपस्थिती होती. यात्रेत उत्तम व्यवस्था केल्याबद्दल या सर्व अधिकाऱ्यांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले की, सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे समाजात आध्यात्मिक सकारात्मकता निर्माण होते. अशा उपक्रमांद्वारे चंद्रपूरमध्ये भक्ती आणि संस्कृती यांचे संतुलन राखले जात आहे. यंदा यात्रा परिसरात प्रशासनाच्या सहकार्याने आपण उत्तम व्यवस्था उभी करू शकलो. यात्रा परिसराचा विस्तार केल्यामुळे भाविकांना राहण्याची सोय झाली. पिण्याच्या पाण्याची, पूजा साहित्य खरेदीची, आंघोळीची, चेंजिंग रूमची व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली. यात्रेकरूंच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
या वर्षीच्या यात्रेचे आयोजन विशेष ठरले. प्रशासनाच्या सक्रिय सहकार्यामुळे यात्रा परिसरात पूजा साहित्य विक्रीसाठी दुकाने, अन्नदान वितरण व्यवस्था, आणि भाविकांसाठी मार्गदर्शक स्वयंसेवक यामुळे संपूर्ण यात्रा शिस्तबद्ध आणि सुसंगठित झाली. ही सर्व व्यवस्था करताना जनतेच्या गरजा केंद्रस्थानी ठेवण्यात आल्या. त्यामुळे भाविकांचा चेहरा आनंदी आणि समाधानी दिसत होता, हीच आपल्या प्रयत्नांची खरी पावती असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.
शहनाज अख्तर यांच्या सुमधुर आवाजात सादर झालेल्या संतवाणी, भक्तिगीते आणि भावगीतांनी संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अल्पावधीत सदर व्यवस्था उभारण्यात आल्याचे सांगितले. पुढील वर्षी यापेक्षाही अधिक चांगली व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला मनीष महाराज, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, रघुवीर आहिर, प्रकाश देवतळे, तुषार सोम, मनोज पाल, श्री माता महाकाली महोत्सवचे सचिव अजय जयस्वाल, कोषाध्यक्ष पवन सराफ, माजी नगरसेविका छबू वैरागडे, पुष्पा उराडे, वंदना तिखे, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, मोनू चौधरी, प्रदीप किरमे, राजेंद्र अडपेवार, पुरुषोत्तम राऊत, कल्पना बबूलकर, श्री माता महाकाली महोत्सव समितीचे विश्वस्त वंदना हातगावर, सविता दंढारे, श्याम धोपटे, चंदू वासाडे, अजय वैरागडे, संजय बुरघाटे, रूपेश भुते, रंजन ठाकूर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा जीवनकर यांनी केले.