Home Breaking News घुग्घूस मुस्लिम समाजाच्या वतीने पहलगाम आतंकवादी हल्ल्याचा जाहीर निषेध!

घुग्घूस मुस्लिम समाजाच्या वतीने पहलगाम आतंकवादी हल्ल्याचा जाहीर निषेध!

80
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

घुग्घूस मुस्लिम समाजाच्या वतीने
पहलगाम आतंकवादी हल्ल्याचा जाहीर निषेध!

सुवर्ण भारत: पंकज रामटेके 
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घूस : काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील मिनी स्वीटझरलँड म्हणून प्रसिद्ध पर्यटन स्थळ बैसरन व्हॅली येथे दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या जवळपास पर्यटकावर गोळीबार केला
भयाड हल्ल्यात जवळपास 27 निष्पाप नागरिकांचा जीव गेला.
हा कट अंत्यन्त कट कारस्थानातून व नियोजित पद्धतीने केला आहे
देशातील शांती अखंडता एकता संपविण्याच्या उद्देशाने हा पाकिस्तान समर्थीत हल्ला असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे.

या भयाड हल्ल्याचा घुग्घूस शहरातील मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने आज दिनांक 25 एप्रिल रोजी जुमा नमाजी नंतर जाहीर निषेध करण्यात आला.

या आतंकवाद्यानी सतत इस्लाम व मुस्लिम समाजाला हेतूपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला असून मुस्लिम समाज आपल्या देशवासी भावांडाच्या हत्येने दुःखी आहे
संतप्त आहे आक्रोशीत आहे
सरकारने या भयाड आतंकवादी हल्ल्याचा बदला घ्यावा पाकिस्ताना सोबत युद्ध छेळावे या युद्धात प्रामुख्याने मुस्लिम समाजातील युवकांना शामिल करावे अशी मागणी ही मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली.