•चंद्रपूरच्या माता महाकाली मंदिर येथे २५ हजार भाविकांना महाप्रसादाचे वितरण !
• भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा तथा आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवारचे आयोजन
चंद्रपूर :प्रियंका गायकवाड
शहरातील श्रद्धास्थान असलेल्या माता महाकाली मंदिर परिसरात मोठ्या भक्तिभावाने महाप्रसाद वितरण कार्यक्रम पार पडला. मंदिरात आलेल्या सुमारे २५ हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टी आणि आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराचे सदस्य सलीम शेख, विशाल बुरडकर, प्रसाद जोरगेवार, सुशांत वाजपेयी, फैजान शेख, मंथन वासाड, अनिकेत पद्मगीरीवार, सुरज पडोले, ऋषभ भरद्वाज, मितेश सागराणी, प्रज्योत जुनगडे, बॉबी हॅलोलूया आदींची उपस्थिती होती.
दरवर्षीप्रमाणे यंदाही माता महाकालीच्या चैत्र नवरात्र महोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. श्रद्धाळूंनी माता महाकालीच्या जयघोषात परिसर भक्तिमय केला होता.
यावेळी या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले.या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी भाविकांशी संवाद साधत माता महाकालीचे आशीर्वाद सर्वांवर राहो, अशी प्रार्थना केली. ते म्हणाले शहरात धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक परंपरांचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. अशा कार्यक्रमातून समाज एकत्र येतो व आपले श्रद्धास्थान अधिक बळकट होते.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अत्यंत सुंदर पद्धतीने पार पाडण्यात आले. भक्तांच्या सोयीसाठी वाहतूक आणि पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दोन दिवस चाललेल्या या महाप्रसादाचा २५ हजारांहून अधिक भाविकांनी लाभ घेतला.