
कै. निळकंठराव शिंदे प्रशा. सेवा महाविद्यालय वरोरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा:कै. निळकंठराव शिंदे प्रशा. सेवा महाविद्यालयात १४ एप्रिल ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
‘ शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा ‘. असा मूलमंत्र देऊन शोषित, पीडित, उपेक्षित, वंचित तथा संपूर्ण भारतवासियांमध्ये नवचेतना निर्माण करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे आणि महाविद्यालयाचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे सर उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अजय रामटेके सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून याप्रसंगी, ‘ माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. संविधानामुळे देशातील सर्व जनतेला त्यांचे मूलभूत हक्क प्राप्त झालेत आणि विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करण्यामध्ये त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे असे विचार त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यार्थी कुणाल शेंडे याने केले व आभार प्रदर्शन दिपाली चवले हिने केले. याप्रसंगी प्रा. प्रमोद पाठक, प्रा.पियुष लांडगे, प्रा. सीमा बोभाटे, प्रा. यामिनी नन्नावरे, प्रा. प्रणाली नरड आणि शिक्षकेतर कर्मचारी इंदिरा निखाडे आणि विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर कार्यक्रमाची सांगता संविधान उद्देशिका वाचनाने करण्यात आली.