Home Breaking News #Ghugus • जय भीमच्या घोषणांनी दुमदुमले घुग्घूस शहर • घुग्घुस शहरात...

#Ghugus • जय भीमच्या घोषणांनी दुमदुमले घुग्घूस शहर • घुग्घुस शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंती उत्साहात साजरी

10
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

#Ghugus
• जय भीमच्या घोषणांनी दुमदुमले घुग्घूस शहर

• घुग्घुस शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंती उत्साहात साजरी

सुवर्ण भारत: पंकज रामटेके

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस: १४ एप्रिल २०२५ सोमवार रोजी महामानव प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घुग्घुस शहरातील वार्डा-वार्डातील सकाळी बौध्द विहारात तसेच आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात, जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात,काँग्रेस कार्यलयात अनेक ठिकठिकाणी सामुहिक बौध्द वंदना घेण्यात आले व महामानव प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस द्विपजवलीत करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तहसील कार्यालयासमोर पुतळ्याजवळ एकत्र येत हजारो अनुयायांनी महामानवाला मानवंदना दिली. रॅली, मिरवणुकीतून ‘एकच साहेब… बाबासाहेब ‘चा जयघोष निनादला.

सांयकाळी शहरात ठिकठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. ढोल ताशांचा गजर, जय भीमचा नारा, फटाक्यांची आतिषबाजी अशा उत्साहात रात्री उशिरापर्यंत जल्लोष सुरू होता. शहरातील मुख्य रस्ते आंबेडकरी अनुयायांनी फुलून गेले होती. ठिकठिकाणी केलेली आकर्षक विद्युत रोषणाई, विविध संगीतमय कार्यक्रमांनी मिरवणुकीत रंगत आणली. आंबेडकर जयंतीनिमित्त सांयकाळी ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या,तसेच अनेक मुख्यचौकातील ठिकठिकाणी मसाला भात,पाणी बाटल,शीतपेय,ऑईस्किम व अन्य गरजु वस्तु वाटपात होते,
रॅली गांधी चौक, बँक ऑफ इंडिया ते तहसील कार्यालयात नवबौद्ध स्मारक समिती घुग्घुस डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा येथे समारोपीय कार्यक्रम आयोजित केले होते.

नवबौद्ध स्मारक समितीने रॅलीत येणारे बांधवाचे स्वागत करण्यात आले. तसेच तथागत गौतम बुद्ध, प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.