#Beed DIst
आष्टीचे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय वाऱ्यावर—
एक शिपाई हजर , एक कनिष्ठअभियंता दौऱ्यावर इतर अधिकारी मात्र गायब—
सुवर्ण भारत: गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
8087175712
आष्टी ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयातील एक शिपाई सोडला तर इतर सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकारी गैरहजर असल्याचे सोमवार दि. 5 एप्रिल रोजी दिसून आले. सकाळी या कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्याच असल्याचे पाहायला मिळाले .
राष्ट्रीय येथील पंचायत समितीमध्ये आष्टी तालुका ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यालय असून , या कार्यालयामार्फत आष्टी तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजना राबवल्या जातात. सध्या उन्हाळी परिस्थिती असल्याने आष्टी तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये पाणीटंच निर्माण झालेली आहे . असे असतानाही हे कार्यालय मात्र गंभीर नसल्याचे दिसून येते . केंद्र सरकारचे महत्वकांक्षी योजना असलेले जल जीवन मिशन हे देखील योजना या कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे रखडले असल्याचे दिसून आले . दरम्यान आष्टी येथील मनसेचे कैलास दरेकर यांनी या कार्यालयाला सोमवार दिनांक पाच एप्रिल रोज सकाळी 11 वाजता भेट दिली असता या कार्यालयात एक शिपाई सोडता इतर सर्व अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आली त्यामुळे राष्ट्रीय येथील ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय वाऱ्यावर असल्याचे दिसून आले .
“आष्टी येथील ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयामध्ये एकूण नऊ कर्मचारी अधिकारी आहेत. यामध्ये एक उप अभियंता, पाच कनिष्ठ अभियंता, एक कनिष्ठ सहाय्यक तर दोन शिपाई आहेत. सोमवार दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास या कार्यालयात फक्त एक शिपाई उपस्थित होता तर ही तर सर्व कर्मचारी गैरहजर होते. यापैकी जे. एस.भवर हे डोईठाण येथे साइटवर गेल्याचे येथील नोंदवहीत नमूद केलेले होते इतर अधिकाऱ्याबाबत मात्र या नोंदवहीत काहीच आढळून आले नाही” .
“आष्टी येथील ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयाचे उपा अभियंता गोविंद भुजबळ यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न उचलल्याने संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही “
” दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी—
आष्टी येथील ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयातील अनेक अधिकारी हे सतत गैरहजर असतात. साइटवर गेल्याचे इतर ठिकाणी जातात त्याचबरोबर येथील कार्यालयातील नोंदवहीत ते नोंद करत नाहीत. सध्या उन्हाळा असल्याने तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे असे असतानाही या कार्यालयातील अधिकारी सतत गैरहजर राहतात किंवा उशिरा येतात त्यामुळे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे “
