
#Ghugus
• नवयुवक बौद्ध मंडळाच्या वतीने दोन दिवसीय भव्य कार्यक्रम उत्साहात संपन्न
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घुस (चंद्रपुर) – महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नवयुवक बौद्ध मंडळ, घुग्घुस यांच्या वतीने दोन दिवसीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दि. १३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध गायक भूपेश सवयी यांच्या “जल्लोष भीमगीतांचा” या प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाने सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. रवी कांबळे सर होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक आशिष माशीरकर, माजी सभापती ब्रिजभूषण पाझारे, प्रकाश देवतळे, पारीश डांगे, आनंद सुट्टे, विजय रामटेके, आनंदराव धनविजे, महेश डोंगे आदी मान्यवर उपस्थित होते. श्याम कुमरवार, नागेश पथाडे, भीमेंद्र कांबळे, आनंद सुट्टे यांनी मार्गदर्शन केले. मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. रवी कांबळे सरांचे प्रभावी भाषण झाले.
यावेळी आरोग्य सेविका कांचन चंदनखेडे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
दि. १४ एप्रिल रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड आणि एनसीडी स्क्रिनिंगसारख्या सुविधा देण्यात आल्या. शिबिरात डॉ. निलेश पडगीलवार (मेडिकल ऑफिसर, PHC घुग्घुस), आरोग्य सेविका कांचन चंदनखेडे, अनीता दिवस, मसाडे MPW, अंजू राठोड आणि सेजल यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये मंडळाचे अध्यक्ष इंजि. अमित बोरकर, उपाध्यक्ष दिलीप कांबळे व देवेंद्र भंडारी, सचिव विक्रम गोगला, कोषाध्यक्ष पृथ्वीराज आगदारी, नितीन (बंडू) हस्ते, संघटक मिथुन मानकर, सहसंघटक सिद्धार्थ कोंडागर्ला, सहसचिव तुषार साठे आणि सदस्य व कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
सल्लागार समितीतील आयुष्यमान शंकर गोगला, प्रदीप चांदेकर, अशोक सातपुते, संतोष कांबळे, नामदेव चंदनखेडे, बंडू चांदेकर, रामय्या मासेवार, अमर आगदारी, दीपक खोंडे, श्रीनिवास आगदारी, दिलीप साठे, मोहन दुर्गेम, देवानंद सुटे, विजय रामटेके, नागेश पथाडे, पारीश डांगे, सिद्धार्थ नगराळे, आनंदराव धनविजय, नंदन ओमकार, यादव पाझारे, दुर्गाजी कांबळे, जयंत चिवंडे व सर्व अनुयायींची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
हा दोन दिवसीय कार्यक्रम प्रबोधन, सामाजिक उपक्रम आणि आरोग्य सेवांच्या माध्यमातून अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला.