Home Breaking News #Ghugus • राजमाता निवासस्थानी शेंद्राची मानकरी श्री गुरु यमुनामय यांचे स्वागत

#Ghugus • राजमाता निवासस्थानी शेंद्राची मानकरी श्री गुरु यमुनामय यांचे स्वागत

103
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

#Ghugus
• राजमाता निवासस्थानी शेंद्राची मानकरी श्री गुरु यमुनामय यांचे स्वागत

सुवर्ण भारत: पंकज रामटेके

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर:दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र महिन्यातील महाकाली यात्रेत अश्वारूढ होऊन मानकरी श्री गुरु यमुनामय यांचे आगमन झाले. त्यांच्या उपस्थितीने यात्रेला एक वेगळंच आध्यात्मिक तेज प्राप्त झालं.
आज त्यांनी राजमाता निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यात्रेकरूंसाठी उभारण्यात आलेल्या सुविधा, स्वच्छता, पोलीस बंदोबस्त, पाण्याची व्यवस्था, अन्नछत्र आणि इतर नियोजनाबद्दल त्यांनी विशेष कौतुक व्यक्त केलं.
यावेळी अम्मा का टिफिन आणि महाकाली मातेची मूर्ती देऊन त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. मागील वर्षी त्यांनी अम्मा यांची भेट घेतली होती. यंदा अम्मा आपल्या सोबत नसल्याचे समजताच त्यांनी अम्मांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. हा क्षण अत्यंत भावुक करणारा होता.
महाकाली यात्रेतील शिस्तबद्ध आयोजन, सुविधा आणि सेवाभाव यामुळे पुढील वर्षी यात्रेकरूंची संख्या अधिक वाढणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
श्री गुरु यमुनामय यांच्या भेटीमुळे आम्हाला ऊर्जा आणि आशीर्वाद लाभले. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे होते. आपण सर्व भाविकांचे मन:पूर्वक आभार.