Home Breaking News #Ghugus • नवी दिशा वृद्धाश्रमतर्फे बस स्टँड परिसरात पाणपोई सेवा

#Ghugus • नवी दिशा वृद्धाश्रमतर्फे बस स्टँड परिसरात पाणपोई सेवा

105
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

#Ghugus
• नवी दिशा वृद्धाश्रमतर्फे बस स्टँड परिसरात पाणपोई सेवा

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस – नवी दिशा वृद्धाश्रम, घुग्घुस यांच्यातर्फे स्थानिक नागरिकांसाठी एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला आहे. घुग्घुस बस स्टँड परिसरात प्रवासी आणि नागरिकांना थंड आणि स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी पाणपोई सेवा सुरू करण्यात आली आहे.

या उपक्रमात वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुनील मारुती जूमनाके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, या पाणपोईची देखभाल आणि सेवा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक स्वतः करत आहेत, हे खरंच अनुकरणीय आहे.

समाजाप्रती आपले कर्तव्य बजावत, नवी दिशा वृद्धाश्रमाची ही सेवा इतर संस्थांसाठी आणि व्यक्तींकरिता प्रेरणादायी ठरत आहे. उष्णतेच्या दिवसांत थंड पाण्याची व्यवस्था करून वृद्धाश्रमाने लोकसेवेचे एक उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.

स्थानिक नागरिक आणि प्रवाश्यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले असून, ही सेवा सामाजिक एकता आणि सेवाभावाचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले आहे. अशी आशा आहे की, या प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतील आणि सेवाभावाला अधिक बळ मिळेल.