Home Breaking News #Bhadravti • रेती घाटातून अवैधरित्या रेतीची चोरी भद्रावती तहसीलदारांचा आशीर्वाद ! •...

#Bhadravti • रेती घाटातून अवैधरित्या रेतीची चोरी भद्रावती तहसीलदारांचा आशीर्वाद ! • जिल्हाधिका-यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे निवेदन

134

#Bhadravti
• रेती घाटातून अवैधरित्या रेतीची चोरी भद्रावती तहसीलदारांचा आशीर्वाद !
• जिल्हाधिका-यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे निवेदन

सुवर्ण भारत:किरण घाटे (संपादक)

भद्रावती: तालुक्यातील रेती घाटातुन अवैद्यरित्या होत असलेल्या रेतीच्या चोरीस स्थानिक तहसीलदारांचा आशीर्वाद असलल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव व माजी नगरसेवक राजू गैनवार यांनी केला असून त्यांनी या बाबतीत नुकतेच जिल्हाधिकारी चद्रपूर यांना एक लेखी निवेदन सादर केले आहे.
दरम्यान या बाबतीत सविस्तर चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी निवेदन सादर करण्यास गेलेल्या एका शिष्टमंडळास दिले .
या तालुक्यात अनेक रेतीघाट आहेत. त्यात पिपरी, तेलवासा, कोंढा, जेना, चंदनखेडा, पाटाळा, राळेगाव ( रिठ ) यासह अनेक लहान – मोठया रेती घाटांचा समावेश आहे. यातील राळेगाव (रिठ ) हा एकमेव रेतीघाट एम.एस. एस.या कंपनीला लिलावात गेला.ही कंपनी दुर्गापूर सिटीपीएस चंद्रपूरला या रेतीचा पुरवठा करते. मात्र इतर रेती घाटाचा लिलाव न होऊन सुद्धा त्यातील रेती मोठया प्रमाणात अवैद्यरित्या जेसीबीद्वारे काढून हायवा,ट्रक, हाॅपटन, टॅक्टरद्वारे चोरी होत आहे. ही चोरी दिवस -रात्र होत आहे. याला स्थानिक तहसीलदार राजेश भांडारकर यांचा आशीर्वाद आहे.
दिनांक ६एप्रिल२०२५ ला पिपरी रेती घाटावर अवैद्य रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती काही तलाठी व पोलीस पाटील यांना मिळाली त्यांनी तिथे धाड टाकली. त्यावेळी टॅक्टर चालक व मालकांनी आम्ही तहसीलदार यांना हफ्ता देतो आपण कारवाई करणारे कोण ? असा प्रश्न करून त्यांना मारहाण केली. या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. एवढ्या उघडपणे रेती चोरटे बोलत असल्याने त्यात काही तरी सत्यता आहे. त्यामुळे तहसीलदार यांची या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राजू गैनवार यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली आहे.
या शिष्टमंडळात भाकपचे राज्य कार्यकारणी सदस्य रवींद्र उमाटे, प्रकाश रेड्डी,टमटम ,नितीन कावठी उपस्थित होते.