• महसूल विभागची रेती तस्करांवर धडक कारवाई…
• २७ लाख १३ हजार ७०० रुपयाचा दंड वसूल… अवैध रेती तस्करीला बसणार चाप
राजेश येसेकरतालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती :- भद्रावती तालुक्यात अवैध रीत्या रेती तस्करीचे प्रमाण वाढले असतांना या प्रकाराला आळा घालण्यासाठी भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर यांनी कठोर पाऊले उचलली असून तीन महिन्यांत अवैध रेती वाहतूक करणार्या २७ वाहणांवर कारवाई करून त्यापैकी २१ वाहण मालकान कडून २७ लाख १३ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल केला असून ६ वाहन मालकांकडून दंड वसूलीची प्रक्रीया सुरू आहे.
रेती तस्करी करणार्या वाहन चालकांकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये मोठे हायवा ट्रक आणि ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. हे सर्व वाहन धारक रात्रीचा वेळी छुप्या मार्गाने पिपरी, कोंढा नाला, बिजोनी आणि ईतरत्र अशा अनेक रेतीची उपलब्ध नाल्यातून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रेती तस्करी करीत असतांनी घाट किंवा नाला जवळपास गावातील वाहणांचा मोठ्या आवाजाने काम धंदे करून थकून भागून आलेल्या नागरीकांची झोप मोढ होत होती. या अवजड वाहणांनी चांगले रस्त्यांची दुरवस्था केली. तहसीलदाचा या कारवाई मुळे रेती चोरट्यांचे नवीन तंत्रज्ञान मोडीत काढीत शासनाला महसूल मिळवून दिला.
परंतू तहसीलदारांचा अशा अनेक कारवाई मुळे रेती माफीयांचे धाबे दणाणले असून ते आता तहसिल प्रशासनावर खोटे- नाटे आरोप करीत आता तहसिल कार्यालयाची बदानामी करण्याची या चोरट्यांनी नवीन शक्कल लढविली आहे.
मात्र तहसीलदार भांडारकर यांनी आपला कर्तव्य कठोर पणा असाच कायम ठेवावा अशी जन मानसात प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे.