
#bhadravti
• महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भद्रावती येथे बौद्ध समाज संघटनेचा विशाल मोर्चा.
राजेश येसेकरतालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : विजासण येथिल बुध्द लेणी येथुन मुख्य मार्गाने बौध्द समाज संघटनेचा तहसीलदार कार्यालय येथे विशाल मोर्चा धडकला होता. देशातील बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचे पवित्र स्थान असल्याने त्याच्याशी बौद्ध समाजाच्या भावना जुळलेल्या आहेत.
त्यामुळे टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करून सदर महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करण्यात यावे यासाठी मोर्चाचे मार्गदर्शक म्हणते ज्ञानज्योती महाथेरो, भंते सच्चक हेरो, भिकुनी सुबोधी, व जिल्ह्यातील भिकू संघ, बौद्ध समाज संघटना भद्रावती तर्फे दिनांक 21 रोज सोमवारला सकाळी 11 वाजता स्थानिक विजासन बुद्ध लेणी प्रवेशद्वारापासून तहसील कार्यालयापर्यंत एक विशाल मोर्चा काढून आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपतींना सादर करण्यात आले. 1949 मध्ये बौद्धगया टेम्पल ॲक्ट निर्माण करून व्यवस्थापन समितीत चार बौद्ध प्रतिनिधी,चार हिंदू प्रतिनिधी व जिल्हाधिकारी असतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.त्यामुळे बौद्ध बांधवांची कायम अनास्था झाली आहे. त्यामुळे बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन सदर महाविहार पूर्णतः बौद्ध प्रतिनिधींच्या व्यवस्थापन समितीकडे सोपविण्यात यावे अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे. सदर मोर्च्यात शहरातील बौद्ध बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.