Home Breaking News #Chandrapur • शिक्षण हे आत्मसन्मासाठी महत्वाचे – पूजा पाटील • क्रांतीज्योती...

#Chandrapur • शिक्षण हे आत्मसन्मासाठी महत्वाचे – पूजा पाटील • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती थाटात साजरी

52

#Chandrapur
• शिक्षण हे आत्मसन्मासाठी महत्वाचे – पूजा पाटील

• क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती थाटात साजरी

#चंद्रपूर -प्रतिनिधी

आयुष्यात यश व अपयश हे येतच असते मात्र अपयशाला न घाबरता ज्या पध्दतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी संघर्ष करुन महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली त्याच प्रेरणेतून आपण सर्वांनी समाजासाठी सदैव संघर्ष करण्यासाठी सज्ज असायला हवे असे आवाहन महिलांना पुजा पाटील यांनी केले.
त्या सौंदणे येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या.
शिक्षण हे आत्मसन्मासाठी फार महत्त्वाचे असल्याच्या पाटील पुढे बोलताना म्हणाल्या.
आयोजित कार्यक्रमाला तेजस्विनी महिला बचत गटाच्या राणीताई वाघमारे,बचत गटाच्या महिला पदाधिकारी, सदस्यां व गावातील महिला मोठ्या संख्येंने उपस्थित होत्या.