Home Breaking News *घुग्घुस नगरी दुमदुमणार बहिरम बाबांच्या जयघोषाने! रक्षाबंधनला भव्य शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन*

*घुग्घुस नगरी दुमदुमणार बहिरम बाबांच्या जयघोषाने! रक्षाबंधनला भव्य शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन*

3

*घुग्घुस नगरी दुमदुमणार बहिरम बाबांच्या जयघोषाने! रक्षाबंधनला भव्य शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन*

*घुग्घुस (चंद्रपूर), दि. 23 -* घुग्घुसचे आराध्य दैवत व कुलदैवत श्री. बहिरम बाबा तीर्थक्षेत्र विकास संस्था, 2 नंबर रोड, घुग्घुस यांच्या वतीने रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्थेचे अध्यक्ष/पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) निमित्त *गुरुवार दि. 28 ऑगस्ट 2026 रोजी* श्री. बहिरम बाबा देवस्थान, प्रभाग क्र. 09, घुग्घुस येथे शोभायात्रा व भव्य महाप्रसाद होणार आहे.

सकाळी 8.00 वाजता विधिवत आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी 10.00 वाजता घुग्घुस नगरीतून श्री. बहिरम बाबांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी 12.00 वाजता राखी महोत्सव साजरा होईल आणि दुपारी 2.00 वाजेपासून भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण सुरू होईल.

या धार्मिक सोहळ्याला माँ शास्त्री माँ दुर्गा मंडळ, बहिरम बाबा पदधारी भजन मंडळ, सत्यशिष्य गुरुदेव सेवा मंडळ, युवा बजरंग व क्रीडा मंडळ आणि शिवजयंती उत्सव समिती, घुग्घुस यांचे सहकार्य लाभले आहे.

तरी समस्त भाविक भक्तांनी व घुग्घुसवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व श्री. बहिरम बाबांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन श्री. बहिरम बाबा तीर्थक्षेत्र विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.